- अभिलाष खांडेकर
लोकमत न्यूज नेटवर्कभाेपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काॅंग्रेसने वचनपत्र जाहीर केले. ‘काॅंग्रेस येणार, समृद्धी आणणार’, असा नारा त्यातून देण्यात आला आहे. जुनी पेन्शन याेजना आणण्याचे तसेच राज्याचा आयपीएल संघ बनविण्याचीही घाेषणा केली आहे. याशिवाय महिला आरक्षणाचेही आश्वासन काॅंग्रेसने दिले आहे. वचनपत्रात २२५ प्रमुख मुद्दे व एकूण १,२९० वचने काॅंग्रेसने दिली आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना निधी‘पढाे-पढाओ’ याेजनेंतर्गत इयत्ता पहिली ते ८वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० रुपये, ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना १ हजार, तर इयत्ता ११वी आणि १२च्या विद्यार्थ्यांना १,५०० रुपये देण्यात येतील. काॅंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी या याेजनेची घाेषणा केली हाेती.
nसहकारी संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देणार.nग्रामीण भागात नवी पदे निर्माण करून भरती केली जाईल.nस्वाभिमान याेजना सुरू करणारnआराेग्य हक्क कायदा बनविण्यात येईल. २५ लाख रुपयांचा आराेग्य विमा काढण्यात येईलn‘मेरी बेटी रानी’ याेजनाेतून मुलींना जन्मापासून लग्नापर्यंत २.५१ लाख रुपयांचा लाभ दिला जाईल.nशेतकऱ्यांना ५ एचपीपर्यंत माेफत वीज, १० एचपीपर्यंत ५० टक्के सवलत.n५०० रुपयांत गॅस सिलिंडरn२ लाख रुपयांपर्यंत कृषी कर्जमाफीn१०० युनिट माेफत वीज nदाेन लाख सरकारी पदांवर भरती करणार.nस्पर्धा परीक्षांच्या शुल्कात १०० टक्के सवलत.n१,५०० रुपयांपर्यंत महिलांना मदत