मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 01:07 PM2023-10-05T13:07:14+5:302023-10-05T13:08:41+5:30

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घोषणेला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. 

orders issued regarding two new districts maihar and pandhurna announcement of cm shivraj, madhya pradesh | मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

मध्य प्रदेशात दोन नव्या जिल्ह्यांच्या प्रस्तावाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांनी केली होती घोषणा

googlenewsNext

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने मैहर आणि पांढुर्णा नवीन जिल्हे बनवण्याचा आदेश जारी केला आहे. हे दोन जिल्हे करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या घोषणेला महसूल विभागाने मंजुरी दिली आहे. 

पांढुर्णा आणि सौसरचे विलीनीकरण करून पांढुर्णा हा नवा जिल्हा होणार आहे. पांढुर्णा तालुक्‍यातील 74 मंडळे आणि सौसर तालुक्‍यातील 137 मंडळांचे विलीनीकरण करून पांढुर्णा नवीन जिल्ह्याची निर्मिती होणार आहे. तर मैहर, अमरपाटण आणि रामनगर यांचे विलीनीकरण करून मैहर हा नवा जिल्हा होणार आहे. शिवराज सरकारने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे.

यावर्षी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पांढुर्णा हा मध्य प्रदेशातील 55 वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली होती. पांढुर्णाशिवाय या जिल्ह्यात सौसर विधानसभेचीही जागा आहे. म्हणजेच काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या या दोन जागांवर जिल्हा निर्माण करून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याचे म्हटले जात आहे. 

लोकसभेच्या 29 जागा असलेल्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून काँग्रेसचे एकमेव खासदार नकुल नाथ आहेत. नकुल नाथ हे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र आहेत. दुसरीकडे, मैहर जिल्हा करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू होती. अनेकवेळा मुख्यमंत्र्यांचा मैहर दौरा नियोजित आणि पुढे ढकलण्यात आला, परंतु सप्टेंबरमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः घोषणा केली होती की, मैहर हा आता मध्य प्रदेशचा नवीन जिल्हा असेल.

Web Title: orders issued regarding two new districts maihar and pandhurna announcement of cm shivraj, madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.