शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

"मी माफी मागितली होती, पण..." तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 8:49 PM

Pragya Thakur: तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Pragya Thakur : (Marathi News) भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी  जाहीर केली आहे. या उमेदवारांच्या यादीत भाजपाने भोपाळमधून प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा यांना तिकीट दिले आहे. प्रज्ञा ठाकूर या अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात राहिल्या आहेत. दरम्यान, तिकीट कापल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

माझ्यासाठी संघटना सर्वोपरि आहे आणि संघटना जी काही जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन, असे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे. तसेच, मी काही शब्दांचा वापर केला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडला नसेल, अशी प्रतिक्रिया प्रज्ञा ठाकूर यांनी दिली आहे. दरम्यान, प्रज्ञा ठाकूर यांना त्यांच्या वक्तव्यामुळे तिकीट रद्द करण्यात आले का?असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की, मी दिलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागितली होती, पण त्यांना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता आणि मी तसे केले नाही. 

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी शनिवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५  उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये भाजपाने मध्यप्रदेशातील 29 पैकी 24 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. भोपाळमधून आलोक शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राज्यातील दोन विद्यमान खासदार यावेळी निवडणूक लढवताना दिसणार नाहीत. यामध्ये प्रज्ञा ठाकूर आणि केपी शर्मा यांचा समावेश आहे. केपी शर्मा यांच्या जागी ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक लढवणार आहेत. 

प्रज्ञा ठाकुरांबाबत काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रज्ञा ठाकूर यांच्यावर नाराज झाले होते. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे हा देशभक्त आहे, असे विधान ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर मोदी म्हणाले होते की, याबाबत मी प्रज्ञा ठाकूर यांना माफ करु शकणार नाही. गोडसेबाबतच्या वक्तव्यावर प्रज्ञा ठाकूरांनी माफी मागितली आहे, मात्र, मी त्यांना कधीही माफ करु शकणार नाही, असे पीएम मोदी म्हणाले होते. 

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश