ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:38 PM2024-01-03T19:38:43+5:302024-01-03T19:52:30+5:30

जिल्हाधिकारी कन्याल यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला

Qualifying a truck driver is expensive; Action by the Chief Minister directly on the Collector of shajapur madhya pradesh | ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

ट्रक ड्रायव्हरची 'लायकी' काढणं महागात; कलेक्टरवर थेट मुख्यमंत्र्यांची कारवाई

भोपाळ - 'हिट अँड रन' संदर्भातील नवीन कायद्याला विरोध करत देशातील ट्रकचालक रस्त्यावर उतरले होते. ट्रक आणि टँकर चालकांनी चक्का जाम आंदोलन सुरू केल्याने गाड्या एकाच जागेवर ठप्प होत्या. त्यामुळे, सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने मध्य प्रदेशच्या शाजापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. किशोर कन्याल यांनी ट्रक व टँकरचालकांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत सर्वांनाच कायदा हातात न घेण्याचं सूचवलं. यावेळी, ड्रायव्हर आणि जिल्हाधिकारी यांच्यात शाब्दीत वाद झाला. त्यावेळी, जिल्हाधिकारी महोदयांनी वापरलेली भाषा त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे.  

जिल्हाधिकारी कन्याल यांनी उपस्थित ड्रायव्हर्संना सूचना केल्या असता, एका ड्रायव्हरने स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच, नीट समजावून सांगा, असेही तो म्हणाला. त्यावर, जिल्हाधिकारी महोदयांना राग अनावर झाला आणि त्यांनी ड्रायव्हरला सुनावले. यामध्ये चुकीचं काय आहे?, समजतो काय स्वत:ला, काय करणार तू, तुझी लायकी काय?, अशा प्रश्नांचा भडीमार केला. त्यावर, ड्रायव्हरने दिलेल्या उत्तराने कलेक्टर महोदयांची बोलतीच बंद झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तर, अनेकांनी सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर, मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हाधिकारी किशोर कन्याल यांच्यावर कारवाई केली आहे.

किशोर कन्याल यांना शाजापूर कलेक्टर पदावरुन हटविण्यात आले आहे. आमच्या सरकारमध्ये अशी भाषा कदापि सहन केली जाणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शाजापूर कलेक्टर पदावरुन त्यांची उचलबांगडी केली आहे. दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर जिल्हाधिकारी कन्याल यांनी माफी मागितली होती. 

हे होतं ड्रायव्हरचं उत्तर

हीच तर आमची लढाई आहे की, आमची काहीच लायकी नाही. त्यावर, कलेक्टर म्हणाले लढाई अशी असू शकत नाही. कृपया तुम्ही कायदा हातात घेऊ नका, तुमच्या सर्व अडचणी ऐकण्यासाठीच तुम्हाला इथं बोलावलं आहे, असे जिल्हाधिकारी कन्याल यांनी म्हटलं होतं. पण, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

काय आहे प्रकरण

हिट अँड रन संदर्भात केंद्र सरकारने केलेल्या नवीन कायद्याला विरोध करत ट्रक ड्रायव्हर्सने चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. भारतीय न्याय संहितानुसार बेजाबादारपणे गाडी चालवून गंभीर दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या आणि पोलीस प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याला न सांगता पळ काढणाऱ्या वाहनचालकांना १० वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ७ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. कायद्यातील शिक्षेची ही तरतूद मोठी असून त्यास ट्रकचालकांचा विरोध आहे. तसेच, जोपर्यंत हा कायदा वापस घेतला जात नाही, तोपर्यंत विरोध आंदोलन सुरूच राहिल, असे ट्रकचालकांचे म्हणणे आहे. 
 

 

Web Title: Qualifying a truck driver is expensive; Action by the Chief Minister directly on the Collector of shajapur madhya pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.