Husband Wife Arguments: गेले काही दिवस SDM पदी विराजमान झालेल्या PCS अधिकारी ज्योति मौर्य यांची चर्चा आहे. त्यांचा विवाह आणि त्यानंतर असलेल्या विवाहबाह्य नातेसंबंधांमुळे हे नाव चर्चेत आले. पती आलोक मौर्य यांनी असा आरोप केला की त्याने स्वकष्टाने पत्नी ज्योतिला शिक्षण दिले आणि अधिकारी बनवले. पण अधिकारी झाल्यानंतर मात्र ज्योतिचा दुसऱ्याच एका माणसावर जीव जडला आणि तिने त्याच्यासोबत संसार थाटणार असल्याचे सांगितले. आता असाच एक प्रकार वेगळ्या ठिकाणाकडून समोर आला आहे.
मध्य प्रदेशातील रीवा येथील सुशील मिश्रा यांनी आरोप केला आहे की, 20 मे 2013 रोजी त्यांचे लग्न झाले होते. त्यावेळी दोघेही शिकत होते. पत्नी बारावी उत्तीर्ण झाली होती. सुशीलने सांगितले की, त्याने आपल्या विवाहित पत्नीला शिकवले आणि मिलिटरी स्कूलमध्ये नर्सची नोकरी मिळवून दिली. त्यानंतर ती त्यांना विसरून गेली आणि दूर राहू लागली. सुशील मिश्रा यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीचे त्यांच्या शाळेतील एका शिक्षकासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिला लग्न मोडायचे आहे. पती सुशील याने सांगितले की, मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. मी सर्वत्र तक्रार केली पण कुठेही सुनावणी होत नाही. पत्नीला शाळेतही भेटू दिले जात नाही. त्याने सांगितले की त्याला पाच वर्षांची मुलगी देखील आहे, परंतु तो तिलाही भेटू शकलेला नाही.
नवरा काय म्हणाला?
सुशीलने सांगितले की, जेव्हा त्याच्या पत्नीला अमेठीच्या सैनिक स्कूलमध्ये नोकरी लागली तेव्हा तिचे शिक्षक मार्कंडेय पांडे यांनी डाव साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. भावनिक होऊन सुशील मिश्रा म्हणाले की, दोन वर्षांपासून माझा छळ केला जात आहे. मी आता बेरोजगार आहे. 2021 साली पत्नीची पोस्टिंग झाली आणि तेव्हापासून माझ्यासोबत गैरवर्तन केले जात आहे.
पती सुशील मिश्राचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पत्नीनेही आपले स्पष्टीकरण दिले आहे. आई-वडिलांनी तिचे शिक्षण पूर्ण केले, त्यामुळेच तिला नोकरी मिळाली, असे पत्नीचे म्हणणे आहे. पत्नीने सांगितले की, पती तिला त्रास देत होता. कौटुंबिक न्यायालयात यावर खटला सुरू आहे. पण पती-पत्नी आणि शिक्षण या गोष्टींचा संबंध आल्याने ज्योती-आलोक मौर्य यांच्यानंतर आता हे प्रकरणही चर्चेत आले आहे.