मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघात एकूण सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत सात मजुरांचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने जाणारा टॅम्पो आणि ऑटो यांची धडक झाल्याने हा अपघात झाला. वेगाने येणाऱ्या वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली त्यामुळे ऑटोमध्ये बसलेले मजूर वाहनाखाली गाडले गेले.
दरम्यान, सर्व मृत व जखमी प्रतापपूर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. ते ऑटोने प्रवास करत होते. रेल्वेने पुढील प्रवास करण्यासाठी ते ऑटोने सिहोरा स्थानकाकडे जात होते. पण खमरिया गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये एका मुलासह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी नाकाबंदी करून राज्य महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाने तातडीने या अपघाताची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.