'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 21:13 IST2025-02-13T21:13:18+5:302025-02-13T21:13:47+5:30

या समारंभादरम्यान शिवराज सिंह चौहान आपल्या पत्नीसोबत 'जट यमला पगला दीवाना' या गाण्यावर डन्स करताना दिसत आहेत.

shivraj sing chauhan danced with wife sadhana singh on the song Jat Yamla Pagla Deewana on son marriage | 'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

'जट यमला पगला दीवाना' गाण्यावर शिवराज सिंहांनी पत्नीसोबत धरला ठेका; मुहुर्तही खास, बघा VIDEO

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान सध्या अत्यंत आनंदात आहेत. कारण त्यांच्या छोटा मुलगा कुणाल सिंह चौहानच्या लग्नाचे विधी सुरू आहेत. शिवराज सिंह चौहान आणि त्यांची पत्नी साधना सिंह या हे विधी पार पाडत आहेत. यांपैकी हळदीच्या समारंभातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या समारंभादरम्यान शिवराज सिंह चौहान आपल्या पत्नीसोबत 'जट यमला पगला दीवाना' या गाण्यावर डन्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये शिवराज सिंह चौहान अत्यंत आनंदात दिसत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 12 फरवरीला पोस्ट करण्यात आलेल्या एका विडिओमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे की, "आज मुलगा कुणाल यांच्या विवाहानिमित्त सनातन परंपरेनुसार, विधिवत मंडप टाकण्यात आला. मी, धर्म पत्नी साधना आणि मुलगा कुणाल यांच्यासोबत, षोडशोपचार पद्धतीने वैदिक मंत्रांसह पूजा केली.

शिवराज सिंह चौहान यांनी पुढे लिहिले आहे की, "या प्रसंगी आम्ही भगवान गणेश, अंबिका आणि वरुण पूजनासह मंडपांग देवतेची (ब्रह्मा, विष्णु, रुद्र, इंद्र, कूर्म, अनंत, वाराह, विश्वकर्मा तथा वास्तू देव) पूजा-अर्चना केली. याच बरोबर, मंडपाच्या संरक्षणासाठी कुणालच्या काकांनी (आत्याचे पती) त्रिसूत्रीकरण केले.

आणखी एका पोस्टमध्ये शिवराज सिंह चौहान यानी म्हटले आहे, "लग्नात हळदी समारंभाला विशेष महत्त्व आहे. आज कुटुंबातील सर्व माता आणि ज्येष्ठांनी कुणालच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी विधिवत हळदीचा समारंभ पार पाडला. यानंतर आत्याने 'बांगडी दोरा' हे शुभ रक्षासूत्र बांधून आशीर्वाद दिले. संपूर्ण कार्यक्रम मधुर संगीतात आनंदाने पार पडला.

Web Title: shivraj sing chauhan danced with wife sadhana singh on the song Jat Yamla Pagla Deewana on son marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.