शिवराज सिंह भावूक, निवडणूक लढवणार नाहीत? म्हणाले मी निघून जाईन तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 03:18 PM2023-10-04T15:18:25+5:302023-10-04T15:18:43+5:30
Shivraj Singh : मध्य प्रदेशमध्ये जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसं राज्यातील राजकीय वातावरण तापत आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान निवडणूक लढवणार की नाही याबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, चौहान यांनी जनतेला संबोधित करताना निवडणूक लढवण्याबाबत भावूक प्रश्न विचारला. त्यांनी जनतेला विचारले की, निवडणूक लढवायची आहे की नाही? इथून निवडणूक लढवायची की नाही. या प्रश्नावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी मामा-मामा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हात जोडून आभार मानले. तसेच यावेळी शिवराज सिंह चौहान हे भावूक झालेले दिसले.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या बुधनी या विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी मतदारांना इथून निवडणूक लढवू की नको, असा प्रश्न विचारला. शिवराज सिंह चौहान यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी राजकीय परिभाषा बदलली आहे. काँग्रेसचं सरकार तुम्ही अनेक वर्षांपासून पाहिलं आहे. कधी जनतेसाठी अशी चिंता असे का, मी सरकार नाही तर कुटुंब चालवत आहे. असा भाऊ भेटणार नाही. जेव्हा मी निघून जाईन तेव्हा माझी खूप आठवण येईल.