धक्कादायक! ऑनलाईन लोनमध्ये गुरफटत गेला, पती-पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 03:17 PM2023-07-13T15:17:38+5:302023-07-13T15:23:20+5:30
आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती
भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली असून दोन लहान मुलांसह पती-पत्नीने स्वत:चे जीवन संपवले. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. पती-पत्नी अगोदर आपल्या मुलांना विष पाजले, त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. पीडित व्यक्तीने आर्थिस संकटात सापडल्याने, कर्जामुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासातून समोर येत आहे.
भोपाळच्या रातीबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोटही आढळून आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित व्यक्तीने सुसाईड नोट लिहली होती, पोलिसांना घटनास्थळी सेल्फॉसच्या गोळ्याही आढळून आल्या आहेत. पती-पत्नीने अगोदर ८ वर्षाच्या मुलाला आणि नंतर ३ वर्षाच्या मुलाला सल्फासच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर, पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे एसीपी चंद्रप्रकाश पांडे यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एका खासगी इन्शुरन्स कंपनीसाठी काम करत होता. मात्र, आर्थिक नुकसान झाल्यामुले ते दूर करण्यासाठी त्याने कर्ज काढले होते. मात्र, कर्ज काढल्यानंतर तो अधिकच कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. कर्जाचे हफ्ते थकत गेले आणि कर्ज वाढत गेल्यामुळे अखेर पीडित व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आहे. ऑनलाईन लोन व जॉबच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारात गुरफटून गेल्याने पीडित व्यक्तीला संबंधित लोन कंपनीकडून मानसिक त्रास झाला. त्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र, आमचे शवविच्छेन न करता, चौघांवरही एकत्रितपणे अंत्यविधी करण्यात यावा, अशी इच्छा पीडित व्यक्तीने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचे आढळून आले आहे.