बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीचा मृत्यू; तीन दिवसांची बचाव मोहिम अपयशी...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 06:36 PM2023-06-08T18:36:00+5:302023-06-08T18:36:22+5:30

तीन वर्षीय सृष्टी मंगळवारी 300 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकली होती.

Sihor madhya pradesh toddler stuck in borewell died; A three-day rescue mission failed... | बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीचा मृत्यू; तीन दिवसांची बचाव मोहिम अपयशी...

बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुकलीचा मृत्यू; तीन दिवसांची बचाव मोहिम अपयशी...

googlenewsNext


सिहोर: सिहोर जिल्ह्यात तीन दिवसांपासून 300 फूट खोल बोअरवेलमध्ये अडलेल्या चिमुकलीला वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. सृष्टी कुशवाह नावाची 3 वर्षीय चिमुकली मंगळवारपासून बोअरवेलमध्ये अडकली होती. स्थानिक प्रशासनासह एसडीआरएफ आणि लष्कराचे पथक बचाव तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आज तिला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

सविस्तर माहिती अशी की, मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील मांगवली गावात मंगळवारी दुपारी घराजवळ खेळत असताना सृष्टी बोअरवेलमध्ये पडली. 300 फूट खोल बोअरवेलमध्ये ती 120 फूटांवर अडकली. ती अडकल्याची माहिती मिळताच बचाव पथक तिला वाचवण्यासाठी आले. प्रथम स्थानिक प्रशासनाने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर बुधवारी दुपारपासून लष्कराने बवाच मोहिम हाती घेतली. मुलीला वाचवण्यासाठी समांतर खड्डा खोदण्यात आला. तो प्रयत्नही अयशस्वी झाल्यावर बचावासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला.

रॉडद्वारे बोअरवेलमध्ये हुक घातला
सृष्टीला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीम कॅमेऱ्यावर नजर ठेवून होती. खडकाळ जमीन असल्याने खोदकाम करताना खूप अडचणी येत होत्या. कॅमेऱ्यात मुलीची कोणतीही विशेष हालचाल दिसत नव्हती. मुलीला हुकद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. रोबोटिक कॅमेऱ्यानंतर लष्कराने रॉडला हुक लावून बवाच सुरू केला. एसपी मयंक अवस्थी स्वतः संपूर्ण बचाव कार्याचे नेतृत्व करत होते. आज अखेर तिला बाहेर काढले, पण तिचा मृत्यू झआला होता.

Web Title: Sihor madhya pradesh toddler stuck in borewell died; A three-day rescue mission failed...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.