"भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची"; 50000 शिक्षकांच्या भरतीबद्दल PM मोदींकडून MP सरकारचं अभिनंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 10:07 AM2023-08-22T10:07:30+5:302023-08-22T10:10:07+5:30
"मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे."
भारताची भावी पीढी घडविण्याची, त्यांना आधुनिक बनविण्याची आणि योग्य दिशा देण्याची जबाबदारी आपल्यावर (शिक्षकांवर) आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त होणाऱ्या 5 हजार 500 हून अधिक शिक्षकांना शुभेच्छा देताना म्हटले आहे. यावेळी, राज्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या जवळपास 50 हजार शिक्षकांच्या भरतीसाठी राज्य सरकार अभिनंदनास पात्र असल्याचेही म्हटले आहे. पंतप्रधान मोदी नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण, तसेच त्यांना अभिनंदन पत्र पदान करण्यासाठी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नवनियुक्त शिक्षकांना व्हर्च्युअली संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही नवनियुक्त शिक्षकांवा संबोधित केले आणि त्यांना अभिनंद पत्र वाटले.
मातृ भाषेतून शिक्षणासाठी प्रयत्न -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नव नियुक्त शिक्षक हे राष्ट्रीय शिक्षण धोरन लागू करण्याच्या महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज आहेत. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे योगदान मोठे आहे. यात पारंपरिक ज्ञानापासून ते भविष्यातील टेक्नॉलॉजीला सारखेच महत्व देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रातही नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. मातृ भाषेतून शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. सामाजिक न्यायाच्या भावनेतून इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मातृ भाषेतून शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री चौहान यांनी आदी शंकराचार्य, स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले -
मुख्यमंत्री चौहान म्हणाले, आदि शंकराचार्य म्हणाले होते की, जे मुक्ती देते, तेच शिक्षण आहे. अर्थात जे आपल्याला राहण्यालाय बनवेल. अर्थात आपल्याला ज्ञान, कौशल आणि नागरिकतेचे संस्कार देईल तेच शिक्षण आहे. माझी प्रेरणा आहेत स्वामी विवेकानंद. ते म्हणायचे, जे मनुष्याला मानुष्य बनवेल तेच शिक्षण. मनुष्याचा अर्थ, चारित्र्यसंपन्न, प्रामाणिक, कर्मठ, देशभक्त आणि परोपकारी, तसेच जो जगाला सुंदर बनवेन, तोच मनुष्य. एवढेच नाही, तर श्रीमत भगवद्गीतेचा उल्लेख करत, सात्विक कार्य करणाऱ्यांप्रमाणे आपले व्यक्तिमत्व विकसित करावे, असे आवाहनही शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी नवनियुक्त शिक्षकांना केले.