शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

"दिग्विजय सिंह आणि जयवर्धन सिंह यांचे कपडे फाडा..."; कमलनाथ यांचा 'तो' Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 12:06 IST

भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलं आहे

मध्य प्रदेशातकाँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी आणि निषेध करण्यात येत आहे. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेऊन पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी कमलनाथ यांनी काँग्रेस नेते रघुवंशी यांच्या समर्थकांना सडेतोड उत्तर दिलं.

भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ शिवपुरी जिल्ह्यातून आलेल्या लोकांना म्हणाले, तुम्ही लोक इथे बंड करू नका. दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांच्याकडे जा आणि त्यांचे कपडे फाडा. याचा अर्थ, व्हिडिओमध्ये कमलनाथ वीरेंद्र रघुवंशी समर्थकांना सांगत आहेत की, त्यांनी आता दिग्विजय सिंह आणि त्यांचे आमदार पुत्र जयवर्धन सिंह यांच्याशी याबाबत बोला. भाजपाने आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मध्य प्रदेश भाजपाचे मीडिया प्रभारी आशीष अग्रवाल यांनी निशाणा साधला आहे.  ""दिग्विजय सिंह आणि जयवर्धनचे कपडे फाडून टाका..." अहो कमलनाथ जी, तुम्ही कपडे फाडायला तयार झालात. बरं, अख्खी काँग्रेस फाटली असताना तुम्ही काय करू शकता? दिग्विजय सिंह जी, शिवपुरीहून आलेल्या वीरेंद्र रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये कमलनाथजींसोबत झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच वेदना जाणवतील आणि बदलाही घ्याल. आता कोण कोणाचे कपडे फाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे." असं म्हटलं आहे. 

भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनीही व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, "तिकीट मागणाऱ्यांना कमलनाथांचा सल्ला: जा आणि दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा... राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडण सुरू आहे. जनतेचं यात नुकसान होतं. यांना सत्तेपासून दूर ठेवणं हाच उपाय आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा