शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
2
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
3
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
4
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
5
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
6
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
7
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
8
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
9
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
10
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
12
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
13
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
14
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
15
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
16
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
17
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
18
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
19
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
20
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

मी मुलगा, माझं कोण ऐकणार...! गर्लफ्रेंडवर 'नाना' आरोप; आईला साद घालत मृत्यूला मिठी मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 8:00 PM

अंगावर काटा आणणारी घटना; प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. प्रेम प्रकरणांमुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. येथील युवकाने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून विविध बाबींवर प्रकाश टाकला. प्रेयसीचा भाऊ आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप त्याने सुसाईड नोटमधून केला आहे. 

मी कृतिकाला फोन केला होता कारण तिने माझे खोटे नाव का घेतले हे मला तिच्याकडून ऐकायचे होते. कृतिका मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असे हे माझ्या घरच्यांना माहीत नव्हते. म्हणूनच मला सर्वांना सांगावे लागले की माझे आणि कृतिकाचे प्रेमसंबंध आहेत. पण, आई, तू काही काळजी करू नकोस. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवला आहे. कृतिकाने मला फोन केला तेव्हा मी रेकॉर्डिंग विकीच्या फोनवर पाठवले आहे. आता मी जात आहे आई, तुम्ही चांगले राहा आणि वडिलांना धीर दे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, असे संबंधित युवकाने सुसाईड नोटमध्ये लिहिले. 

मृत रितीकचे गंभीर आरोप

याशिवाय, माझी गाडी ब्रिजखाली उभी आहे. माझे नाव रितीक आहे. माझ्या मृत्यूला कृतिका राठोड, तिचा भाऊ शुभम राठोड आणि निखिल राठोड जबाबदार आहेत. कृतिका आणि माझे वर्षभरापासून अफेअर होते. ही बाब तिच्या घरच्यांना समजली, त्यानंतर कृतिकाला घरातून पळून जाऊन माझ्याशी लग्न करायचे होते, मात्र तिने सोबत कोणतेही कागदपत्रे आणली नाहीत. त्यामुळे आमचे कोर्टातही लग्न होऊ शकत नव्हते. मी कृतिकासोबत काहीच वाईट केले नाही. कृतिकाला खाण्यापिण्यापासून ते कॉलेजला सोडण्यापर्यंत मी तिची काळजी घ्यायचो. मी कृतिकाला तिला लागणाऱ्या सर्व वस्तू आणून दिल्या, पण ती मला ब्लॅकमेल करू लागली. आपल्या बहिणीला बदनामीपासून वाचवण्यासाठी कृतिकाचा भाऊ शुभम हा १५ ते २० गुंडांसह आला आणि त्याने जबरदस्तीने माझा मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमधील सर्व पुरावे त्यांनी मिटवून टाकले. माझ्या म्हणण्यावर पुराव्यांशिवाय कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही मुले आहोत. आमचे कुणी ऐकणार नाही, मुलगी खोटे बोलली तरी सगळे मान्य करतील. म्हणूनच मी जीवन संपवत आहे, असेही मृत युवकाने सुसाईड नोटमध्ये नमूद केले. 

तसेच माझे कुटुंबीय निर्दोष आहेत. त्यांना सुरक्षा द्या, कारण कृतिकाचा भाऊ रोज रात्री १० वाजता येतो, त्यानंतर तो माझ्या कुटुंबाला घाबरवतो. त्याला समजत नाही की त्याच्याच बहिणीने असे का केले? मी पोलिसांना हात जोडून विनंती करतो की, कृतिका आणि तिच्या सर्व भावांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून मला न्याय मिळेल. पोलिसांना माझी विनंती आहे की, कृतिका राठोडला शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून माझ्यासारखे कृत्य कोणीही करता कामा नये. धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो... मिस यू कृतिका, असेही रितीकने सुसाईड नोटच्या माध्यमातून नमूद केले.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSocial Mediaसोशल मीडिया