तुम्ही देशातील अनेक अशा शाळांबद्दल ऐकले असेल, ज्यात वेगळ्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते. पण, मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक अशी शाळा आहे, जिथे मुलांना दोन्ही हाताने लिहिण्याची कला शिकवली जाते. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ही मुले दोन्ही हाताने एकाच वेळी वेगवेगळ्या 6 भाषांमध्ये लिखाण करू शकतात. बहुधा ही देशातील पहिलीच अशाप्रकारची शाळा असावी. सिंगरौलीची ही शाळा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. येथे शिकणाऱ्या मुलांचे खूप कौतुक होत आहे.
सिंगरौली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर बुधेला येथे वीणा वादिनी पब्लिक स्कूल आहे. ही शाळा सामान्य शाळांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. येथे मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिकवले जाते. मुले चार भिंतीत नाही, तर झाडाखाली बसून शिकतात. मुलांनी योग-ध्यान केल्यानंतर शाळा सुरू होते. त्यामुळे मुले एकाग्र होऊन अभ्यास करू शकतात.
100 हून अधिक मुले दोन्ही हातांनी लिहितातइथल्या मुलांना दोन्ही हाताने लिहिण्याची कला शिकवली जाते, ही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. इथे शिकणारी मुलं दोन्ही हातांनी 6 वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहू शकतात. मुले फक्त 1 मिनिटात 1 ते 100 पर्यंत आकडे मोजू शकतात, 12 सेकंदात A ते Z पर्यंत अक्षर बोलू शकतात तर दोन्ही हातांनी फक्त 20 सेकंदात वर्णमाला लिहू शकतात. अशाप्रकारे लेखन करणारी एक-दोन नाही, तर शंभरहून अधिक मुले आहेत.
यातूनच शिकवण्याची प्रेरणा मिळालीदेशातील अशा प्रकारची ही पहिलीच शाळा आहे, जिथे मुले या प्रकारची खास कला शिकतात. सिंगरौली येथील वीणा वादिनी पब्लिक स्कूल 1999 मध्ये सुरू झाले. विरंगत शर्मा यांनी ही शाळा सुरू केली. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद दोन्ही हातांनी लिहायचे, असे वाचले होते. त्यातूनच प्रेरणा मिळाल्याचे शर्मा सांगतात.