Video: अन् अचानक मुख्यमंत्रीच सलूनमध्ये आले, केस कापले; पत्र्याचं शेड, एकच खुर्ची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:48 PM2024-03-05T14:48:38+5:302024-03-05T14:49:58+5:30
बिकानेर - माणसाकडे पद आणि पैसा आल्यानंतर त्याला अनेकदा प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी काही गोष्टींना टाळावं लागतं. अनेकदा काही बाबींची औपचारिकता ...
बिकानेर - माणसाकडे पद आणि पैसा आल्यानंतर त्याला अनेकदा प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी काही गोष्टींना टाळावं लागतं. अनेकदा काही बाबींची औपचारिकता म्हणून प्रोटोकॉलही जपावे लागतात. त्यामध्ये, काही खासगी बाबींनाही प्रोटोकॉल आडवे येत असतात. मात्र, मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाचा रुबाब बाजुला ठेऊन, सुरक्षेसंबंधित प्रोटॉकॉलही काही काळासाठी दूर करुन चक्क एका लहानशा सलूनमध्ये जाऊन केस कापले. मुख्यमंत्री भजनलाल शर्मांची अशी एंट्री त्या न्हाव्यासह सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी होती.
शहरातील एखादा नगरसेवक देखील कटींग, दाढी करण्यासाठी पॉश आणि हायफाय सलूनमध्ये जातो. अनेकदा आमदार आणि खासदार यांच्यासाठी न्हावी घरी येऊन दाढी-कटींग करतात. मात्र, चक्क मुख्यमंत्र्यांनी रात्री एका लहानशा सलून दुकानात आपला ताफा वळवल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सोमवारी रात्री बिकानेर येथील एका लहानशा सलूनमध्ये जाऊन केस कापले.
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मालचंद मारू यांच्या सलूनमध्ये मुख्यमंत्री पोहोचले. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून मालचंद्र मारू यांना १० हजार रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्या कर्जाची परतफेड त्यांनी कुठलेही हफ्ते न थकवता केली. त्यामुळे, त्यांना २० हजारांचे दुसरे कर्ज मिळाले. त्यांच्या या कृतीशील आणि लाभार्थी नियोजनाचे मुख्यमंत्री भजनलाल यांनी कौतुक केले. केंद्र सरकारने कोरोना महामारीच्या काळात स्वनिधीच्या माध्यमातून टपरी व गाडीचालकांसाठी कर्जपुरवठाची योजना सुरू केली आहे.
मारु यांचं पत्र्याचं शेड असलेलं लहानसं सलून असून या सलूनमध्ये एकच खुर्ची दिसत आहे. खुर्चीवर बसल्यानंतर मुख्यमंत्री हे मारू यांच्याशी संवाद साधताना दिसून येतात. तर, मुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील जवान उभे असल्याचेही दिसते. दरम्यान, मुख्यमंत्री शर्म यांच्यासमवेत केंद्रीयमंत्री राम माघवाल हेही रात्री संबंधित दुकानात पोहोचले होते.
सीएम भजनलाल शर्मा देर रात केंद्रीय मंत्री मेघवाल के साथ अचानक एक छोटे सैलून में पहुंचे बाल भी सेट करवाये। सीएम भजनलाल शर्मा का साधारण अंदाज की हो रही है चर्चा@ABPNews@gssjodhpur@abplive@arjunrammeghwal@ashokgehlot51@BhajanlalBjp@BJP4India@pravinyadav#Rajasthanpic.twitter.com/Rvt2Z33sO9
— करनपुरी (@abp_karan) March 5, 2024
दरम्यान, भाजपाने १९५ लोकसभा उमेदवारांची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने भाजपा नेते आणि मंत्री मतदारसंघात दौरे करत असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मध्य प्रदेशातून २५ जागांवर विजय मिळवणार असल्याचं म्हटलं आहे. तर, मध्य प्रदेशम विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने पहिल्यांदा आमदार बनलेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.