भाेपाळ - निवडणुकीच्या निकालांची सर्वांचा प्रचंड उत्सुकता असते. एवढी, की काहीजण चक्क पैज लावतात. आता मध्य प्रदेशचेच घ्या. तेथे मतदान झाले आहे. पण, जिंकणार काेण? यावर लाेकांनी पैजा लावायला सुरुवात केली. दाेन जणांनी तर तब्बल एक लाख रुपयांची पैज लावली असून, तसे शपथपत्रही करून घेतले आहे. त्यावर पाच साक्षीदारांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत, हे विशेष.
साक्षीदाराकडे पैजेचे धनादेश केले जमाछिंदवाडा जिल्ह्यातील सुखापुरा गावातील धनीराम भलावी आणि नीरज मालवीय यांच्यात ही पैज लागली आहे. भलावी यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसच्या सरकार स्थापनेचा तर मालवीय यांनी भाजपच्या सरकार स्थापनेचा दावा केला आहे.
जाे पैज हरेल ताे दुसऱ्याला १ लाख रुपये देईल, असे शपथपत्रात म्हटले आहे. दाेघांनीही प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश अमित पांडे या साक्षीदाराकडे जमा केले आहेत.
या हाॅटसीटवर १० लाखांची पैज-छिंदवाडामध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर छिंदवाडामध्येच प्रकाश साहू आणि राम माेहन साहू यांनी १० लाख रुपयांची पैज लावली आहे. - प्रकाश साहू यांनी भाजप उमेदवार बंटी साहू यांच्यावर डाव खेळला आहे. तर राम माेहन यांनी कमलनाथ यांच्या विजयावर पैज लावली आहे. - या पैजेसाठीही शपथपत्र तयार करण्यात आले असून, तीन साक्षीदारांनाही सहभागी करण्यात आले आहे.