मध्य प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत मोठा उलटफेर झालेला दिसला. भाजपचा पराभव झाला. मात्र, काँग्रेसचे कमलनाथ यांची सत्ता अल्पावधीतच कोसळली. काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह २२ आमदार भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर शिवराजसिंह चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले. यावेळी मात्र ही निवडणूक भाजपला जड जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत न गेलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.
२०१८ चे निकालभाजप १०९कॉंग्रेस ११४बसप २अन्य ५एकूण २३०
कोणते मुद्दे आहेत महत्त्वाचे?- भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत आजपर्यंत चर्चा रंगली होती. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना अखेर सोमवारी बुधनी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली, तरीही भाजपसमोर ज्योतिरादित्य सिंधिया आणि शिवराज सिंह चौहान हे दोन प्रमुख पर्याय आहे.- भाजप ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच चेहऱ्यावर लढवत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा कमलनाथ आणि जितू पटवारी यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांवर राहणार आहे.- भाजपने मध्य प्रदेशमधील धोका लक्षात घेता, केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. त्यात नरेंद्र तोमार, फग्गनसिंह कुलस्ते आणि प्रल्हाद पटेल या तीन मंत्र्यांना उमेदवारी जाहीर केली. तसेच ७ खासदारांनाही तिकीट दिले आहे.- आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपला सत्ताविरोधी लाटेशी लढा द्यावा लागेल. २००३, २००८ आणि २०१३ मध्ये सलग तीन निवडणुका जिंकल्यानंतर, २०१८ मध्ये भाजपचा काँग्रेसकडून पराभव झाला. त्यामुळे सत्ता टिकविण्यासाठी भाजपला जोर लावावा लागेल.- भ्रष्टाचार, बेरोजगारी, महिला मतदारांसाठी योजना, हिंदुत्व, मोफतच्या योजना या यंदाच्या निवडणुकीत चर्चेत राहणार आहे.