अतूट प्रेम! "पतीची साथ सोडायला मी ज्योती मौर्य नाही..."; दिव्यांग नवऱ्यासाठी बायकोची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:58 AM2023-07-19T10:58:36+5:302023-07-19T11:05:50+5:30

गेल्या पाच वर्षांपासून आपल्या दिव्यांग पतीला नोकरी मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे.

wife carried disabled husband on shoulders said i am not jyoti maurya demanding job since 5 years | अतूट प्रेम! "पतीची साथ सोडायला मी ज्योती मौर्य नाही..."; दिव्यांग नवऱ्यासाठी बायकोची धडपड

फोटो - दैनिक भास्कर

googlenewsNext

मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. छतरपूर जिल्ह्यातील प्रियंका गौंड गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या दिव्यांग पतीची सेवा करत आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्या दिव्यांग पतीला अनुकंपा नोकरी मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. प्रियंकाचं आपल्या पतीवर असलेलं हे प्रेम समाजात एक आदर्श उदाहरण बनलं आहे. प्रियंका म्हणते की, मी ज्योती मौर्य नाही, जिने पतीची साथ सोडली. नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीत अनुकंपा नियुक्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

छतरपूर जिल्ह्यातील परसनिया गावातील रहिवासी असलेली प्रियंका गौंड आता अशा लोकांसाठी आदर्श ठरत आहे जे पद मिळताच पतीला सोडून जातात. कारण ती पाच वर्षांपासून आपल्या पतीला उचलून घेऊन अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहे. प्रियंका आपल्या दिव्यांग पतीसाठी राजकारणी आणि अधिकाऱ्यांकडे याचना करत आहे. मंगळवारी प्रियंका पतीला घेऊन जनसुनावणीला पोहोचली तेव्हा ते दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

प्रियंकाचा पती अंशुल गौंड याचा 2019 मध्ये अपघात झाला होता, त्यानंतर तो दिव्यांग झाला. पतीचे म्हणणे आहे की, त्याची आई शिक्षण विभागात शिक्षिका म्हणून कार्यरत होती, परंतु 2015 मध्ये तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून आजतागायत आईच्या नोकरीच्या जागी अनुकंपा नियुक्ती देण्यात आलेली नाही. लवकुश नगर तहसीलच्या परसानिया गावात राहणाऱ्या प्रियंकाचा विवाह अंशुलसोबत 2017 मध्ये झाला होता. अंशुल 2019 मध्ये एका रस्ता अपघातात जखमी झाला होता. त्याच्या पायाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हापासून त्याला चालता येत नाही.

पत्नी तेव्हापासून आपल्या दिव्यांग पतीला घेऊन लोकांकडे मदत मागत आहे. आर्थिक संकटाने त्रस्त असलेली प्रियंका सतत मदतीची याचना करत असते. एक महिला आपली परिस्थिती आणि कुटुंबाची स्थिती सुधारण्यासाठी सतत लढा देत आहे, परंतु कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही. पतीला उचलून घेऊन प्रियंकाने पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या जनसुनावणीत मदतीची याचना केली, जिथे जिल्हाधिकाऱ्यांनी तिला मदतीचे आश्वासन दिले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: wife carried disabled husband on shoulders said i am not jyoti maurya demanding job since 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.