शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

कमलनाथांचा चिरेबंदी ‘किल्ला’ यावेळी भाजप भेदू शकणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 6:41 AM

देशातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या मतदारसंघात काय होणार?

मुंबई : मध्य प्रदेशातला छिंदवाडा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कमलनाथ यांचा ‘चिरेबंदी’ किल्ला समजला जातो. सन २०१९ मध्ये देशभरात आलेली मोदी लाटही या वाड्याला धडक देऊ शकली नव्हती. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ येथून विजयी झाले होेते. 

चार दशकांपासून छिंदवाड्यातील मतदारांनी कमलनाथ आणि पर्यायाने काँग्रेसला साथ दिली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून कमलनाथ यांची या मतदारसंघावरील पकड सैल पडू लागल्याचे चित्र आहे. अगदी अलीकडे विधानसभा निवडणुकीनंतर स्वत: कमलनाथ भाजपच्या वळचणीला जातील, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तसे काही झाले नाही. पण या निवडणुकीत नकुलनाथ यांना तगडे आव्हान भाजपने विवेक बंटी साहू यांच्या रूपाने उभे केले आहे. त्यामुळे कमलनाथ यांचा कस लागणार आहे. १९ एप्रिल राेजी निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात येथे मतदान हाेणार आहे.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

संत्री आणि कापूस हे दोन मुख्य पिके आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे ही दोन्ही पिके भुईसपाट झाली. याकडे काँग्रेस आणि भाजप दोघांनीही कानाडोळा केला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.कमलनाथ यांचे निकटवर्तीय आता हळूहळू भाजपकडे जाऊ लागले आहेत. आतापर्यंत तीन आमदार, २० हून अधिक सरपंच आणि नगरसेवक यांनी पाठ फिरविली. त्यामुळे कमलनाथ यांच्या खेम्यात अस्वस्थता आहे. विवेक बंटी साहू यांना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभय आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमक प्रचार करत आघाडी घेतली आहे. ‘छिंदवाडा का बेटा’ बनाम ‘कमलनाथजी का बेटा’ असे चित्र रंगविण्यात साहू यशस्वी ठरले.

 २०१९ मध्ये काय घडले?नकुल नाथ    काँग्रेस (विजयी)    ५,४७,३०५नाथन शहा    भाजप    ५,०९,७६९मनमाेहन शाह बट्टी    एबीजीपी    ३५,९६८नोटा    -    २०,२३४

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते         टक्के२०१४    कमलनाथ     काँग्रेस         ५,५९,७५५    ५०%२००९    कमलनाथ     काँग्रेस        ४,०९,७३६    ४९%२००४    कमलनाथ     काँग्रेस        ३,०८,५६३    ४०%१९९९    कमलनाथ     काँग्रेस        ३,९९,९०४    ६३%१९९७    सुंदरलाल पटवा (पोटनिवडणूक)     भाजप         ३,४४,३०२   ५१%

टॅग्स :madhya pradesh lok sabha election 2024मध्यप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभा