शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

गाशा गुंडाळा आणि बॉलिवूडमध्ये जा, ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 2:57 PM

Jyotiraditya Scindia: राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यात आपल्या पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास राज्यात आयफा अवार्ड सोहळा आयोजित करण्याची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. या घोषणेवरून आता भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचा हा काय विचार आहे. भाजपा महिला, शेतकरी, मजूर आणि तरुणांना पुढे घेऊन जात आहे.  तर मध्य प्रदेश काँग्रेसने २०१८ मध्येसुद्धा आयफा अवार्डवर आपलं लक्ष्य केंद्रित केलं होतं. आता सरकार आल्यास पुन्हा हा सोहळा आयोजित करू असं सांगत आहेत. 

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान काँग्रेसकडून होत असलेले हल्ले आणि काँग्रेसच्या आंदोलनाबाबत ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, काँग्रेसबाबत आम्ही जेवढं कमी बोलू तेवढं चांगलं ठरेल.जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पोस्टर लावणे. घोषणाबाजी करणे, असली नाटकं काँग्रेसकडून सुरू आहेत. कमलनाथ म्हणतात निवडणुका हा लोकशाहीमधील एक उत्सव आहे. तर उत्सवामध्ये कुणी दगडफेक करतं का? असा सवालही शिंदे यांनी विचारला. 

काँग्रेस सध्या पोस्टर लावणे, जेलभरो करणे, असली कामं करत आहे. तुम्ही तुमची कामं करा, तुम्हाला कुणी अडवलंय. आपली रेषा लांब ओढायची नाही तर दुसऱ्याची रेषा लहान करायची, हीच काँग्रेसची विचारसरणी राहिली आहे. आता काँग्रेस शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहन योजनेची कॉपी करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

यावेळी काँग्रेस नेत्यांकडून सनातन धर्मावर करण्यात येत असलेल्या टिकेलाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसकडे आता केवळ एकच काम उरलं आहे ते म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा. सनातन धर्माला नष्ट करा हाच काँग्रेसचा विचार आणि विचारसरणी राहिली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस