मुंबई: सातव्या वेतन आयोगासाठी सरकारीकर्मचारी आक्रमक झाले आहेत. यासाठी दीड लाख कर्मचारी 5 जानेवारीला संपावर जाणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. सातवा वेतन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी आग्रही आहेत. मात्र अद्याप सातवा वेतन आयोग लागू झालेला नाही. त्यामुळे आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी 5 जानेवारीला सामुदायिक रजेवर जाणार आहेत. याचा मोठा फटका प्रशासकीय कामकाजाला बसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.
दीड लाख अधिकारी जाणार सामुदायिक रजेवर; सातव्या वेतन आयोगासाठी आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 5:55 PM