शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

राज्यातील १ कोटी १० लाख विद्यार्थ्यांना मिळणार दूध भूकटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 7:32 PM

राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देयेत्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या हातात दूध भूकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता शालेय शिक्षण विभागातर्फे चार दिवसांपूर्वी दूध भूकटीची निविदा विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून ३ दिवस त्याचा समावेश करणे अपेक्षित

पुणे:  राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या १ कोटी १० लाख १२ हजार ५४८ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दूध भूकटीचे वाटप केले जाणार आहे. शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून येत्या दिवाळीनंतर विद्यार्थ्यांच्या हातात दूध भूकटीची पाकिटे मिळण्याची शक्यता आहे.राज्य शासनातर्फे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या शालेय पोषण आहारात दूध भूकटीचा समावेश करण्यात आला.त्यामुळे खिचडी व पुरक आहाराबरोबरच विद्यार्थ्यांना दूध भूकटीही मिळणार आहे.राज्यात शालेय पोषण आहार योजनेचा सर्वाधिक लाभ घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या पुणे जिल्ह्यात असून सिधूदूर्ग खलोखाल वर्धा जिल्ह्यात सर्वात कमी विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते.खिचडी तयार करून विद्यार्थ्यांना त्याचे वाटप करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे देण्यात आली आहे. दिवसेंदिवस शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडे शालाबाह्य कामे वाढत आहेत.त्यात आता विद्यार्थ्यांना दूध भूकटीचे वाटप करण्याचे काम शाळांना करावे लागणार आहे.शालेय शिक्षण विभागातर्फे चार दिवसांपूर्वी दूध भूकटीची निविदा काढण्यात आली असून येत्या ८ आॅक्टोबरपर्यंत इच्छुकांकडून निविदा स्वीकारल्या जाणार आहेत.मात्र,केवळ महाराष्ट्रात निर्माण केल्या जाणा-या दूध भूकटीचाच समावेश शालेय पोषण आहारात करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना एका महिन्याला एक २०० ग्रॅम वजनाचे दूध भूकटीचे पाकिट दिले जाणार आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून ३ दिवस त्याचा समावेश करणे अपेक्षित आहे.येत्या आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी निविदा पक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. निवड झालेल्या दूध भूकटी उत्पादक किंवा वितरकाला प्रत्येक शाळेत दूध भूकटीची पाकिटे द्यावी लागतील.मात्र,दिवाळीनंतरच विद्यार्थ्यांना दूध भूकटी मिळेल,असा अंदाज शालेय शिक्षण विभागातील अधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे.--------------

शालेय पोषण आहाराचा लाभ मिळणा-या विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय आकडेवारी : जिल्ह्याचे नाव         विद्यार्थी संख्या अहमदनगर         ५,१७,४६१,अकोला                    १,६५,६०४, अमरावती                   २,६८,७३६, औरंगाबाद         ४,८५,८७४, बीड             ३,८०,५१८,भंडारा                   १,१७,१४१,बुलढाणा                   २,९१,७४७,चंद्रपूर                   १,८३,८४५, धुळे             २,७२,४९०, गडचिरोली         १,१,५०७, गोंदिया                  १,२६,८४०, हिंगोली                  १,६०,१६३, जळगाव                   ५,४४,५८२,जालना                   २,५६,६०१, कोल्हापूर         ४,३,९९७, मुंबई             ६,९९,६७८, लातूर             ३,२९,२६२, नागपूर                  ३,७६,१०३, नांदेड                   ४,६,१६७, नंदूरबार                  १,८६,२२९, नाशिक                  ६,९३,६७७, उस्मानाबाद         १,८६,२२९, पालघर                 २,५५,१७३, परभणी                 २,५०,५९६, पुणे             ७,६२,८५२, रायगड                 २,३,६७६, रत्नागिरी                १,४२,३९० , सांगली               ३,५,१७१,  सातारा               २,७४,६२३, सोलापूर               ५,१३,४१९ , सिंधूदूर्ग                ७१,३९१, ठाणे             ५,४१,९३०, वर्धा             ९८,७९०, वाशिम               १,४१,१४२, यवतमाळ         २,९३,९९६

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीmilkदूधState Governmentराज्य सरकार