शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

"महाराष्ट्रात 1 लाख कोटींचा घोटाळा"; बड्या नेत्यांची नावं घेत संजय राऊतांचा थेट मोदींना सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 5:59 PM

"आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जबरदस्त हल्ला चढवला. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा 'अश्वमेध' रोखण्यासाठी तब्बल 15 विरोधी पक्ष नुकतेच बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात एकत्रित आले होते. यावर बोलताना, "पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. तेथे जे विरोधक एकवटले होते, त्या सर्वांनी मिळून 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे," अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधा मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. 

"महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे" -संजय राऊत म्हणाले, "आमचा घोटाळा जर २० लाख कोटींचा असेल, तर जे भारतीय जनता पक्षाच्या फोटो सेशनमध्ये जमतात त्यांचा ५० लाख कोटी रुपयांचा आहे. महाराष्ट्रात १ लाख किटींचा आहे. दादा भुसे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कूल, एक लाख कोटी, सर्व पुरावे दिलेले आहेत. पंतप्रधान यावर कारवाई करणार आहेत का? आणि मग त्यांनी आमच्यावर टीका करावी. पार्लमेंट का चालू शकली नाही? कारण आम्ही भष्टारासंदर्भात प्रश्न केले आणि आपण त्यापासून पळून गेलात. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला जे प्रश्न विचारले. यावर आपण उत्तर दिले आहे का? हे फोटो सेशन आणि विरोधी पक्षांवर टीका करणे सोपे आहे. याची उत्तरं 2024 ला मिळतील."

काय म्हणाले मोदी - विरोधकांना लक्ष्य करत मोदी म्हणाले, "पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही आणि प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करेन. जर विरोधकांकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर माझ्याकडेही तुम्हा सर्वांसाठी एकच गॅरंटी आहे आणि ती म्हणजे भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांना मी सोडणार नाही. आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होत आहे, हे पाहून ते एकत्र आले आहेत."

"पाटण्यात एकत्र आलेल्या सर्व पक्षांनी मिळून 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला" - मोदी म्हणाले, पाटण्यात जे विरोधक एकवटले होते, त्यांची यादी केली तर सर्व पक्षांनी मिळून एकूण 20 लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच एकट्या कॉंग्रेस पक्षाने लाखो कोटींचा घोटाळा केला, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 कोटी रूपयांचा घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदी म्हणाले.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना