शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

१ मे रोजीच भाजपाची शिवसेनेवर कुरघोडी

By admin | Published: May 02, 2016 1:03 AM

मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपाने चांगलेच धोबीपछाड दिले. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपाने मुंबईभर धडाक्यात महाराष्ट्र दिनाचा

- गौरीशंकर घाळे, मुंबई

मराठी अस्मितेचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला मित्रपक्ष भाजपाने चांगलेच धोबीपछाड दिले. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपाने मुंबईभर धडाक्यात महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा केला. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात भाजपाने आक्रमकपणे कार्यक्रमांची आखणी करत शिवसेनेला अक्षरश: बाजूला सारले. दरवर्षी शिवसेनेच्या शाखा आणि विभागांच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनाचा उत्सव साजरा होतो. चौकाचौकांत फडकणारे भगवे ध्वज, रोशणाई, छत्रपती शिवाजी महाराजांचा आकर्षक पद्धतीने सजविलेला पुतळा आणि त्याजोडीला सत्यनारायण वगैरे पूजा असा दरवर्षीचा शिवसेना स्टाईल उत्सव यंदा अभावानेच पाहायला मिळाला. त्याउलट भाजपाने मात्र आधीपासूनच जोरदार आघाडी उघडली. महत्त्वाचे चौक, रस्त्यांवर भाजपाचे झेंडे लावण्यात आले. बस स्टॉपपासून उड्डाणपुलांवर स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचे होर्डिंग झळकत होते. मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या विकासासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचा संदेश या होर्डिंगद्वारे देण्यात आला. राज्य आणि केंद्र सरकारच्या विकासकामांची या माध्यमातून जोरदार प्रसिद्धी करण्यात आली. मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांतून कार्यक्रम करण्याची योजनाबद्ध आखणी करण्यात आली. कार्यक्रमासाठी स्थानिक पातळीपर्यंत आवश्यक ती सर्व ‘रसद’ पोहोचेल याची खास व्यवस्था करण्यात आली. शिवसेनेला कसलीच संधी मिळणार नाही याची पुरेपूर दक्षता या वेळी घेण्यात आली. शहरात भाजपाकडून ५००च्या वर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात वैद्यकीय शिबिरे, फळेवाटप, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा कार्यक्रमांची रेलचेल होती.