शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

पंधरा वर्षे वयाच्या १० लाख गाड्या; फिटनेसची खात्री द्यायची कोणी..?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 6:25 AM

मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत.

मुंबई/ठाणे :

मुंबई महानगरात आताच्या घडीला सुमारे ९० लाख वाहनांची नोंदणी झालेली आहे. संपूर्ण प्रदेशातील वाहनांपैकी ३२ लाख वाहने ही पंधरा वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असून, या वाहनांच्या फिटनेसबाबत खात्री देता येईल, अशी माहिती परिवहन विभागाकडे उपलब्ध नाही. वाहनांच्या फिटनेसबाबत परिवहन विभाग वारंवार तपासणी मोहिमा हाती घेत असले तरी सुरक्षित प्रवासाची हमी देता येईल अशी ठोस माहिती कोणाकडेही उपलब्ध नाही.

मुंबई महानगर क्षेत्रात २००७ मध्ये ३२ लाख १३ हजार वाहनांची नोंद झाली होती. या वाहनांची पंधरा वर्षांची मुदत पूर्ण झाली आहे. त्यापैकी किमान १० लाख वाहने रस्त्यावर असावीत, असा वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. मुंबई-ठाण्यात वाहनांच्या फिटनेसबाबत जागरूकता दिसते. परंतु, उर्वरित महानगर क्षेत्रात, मुदत संपलेली वाहने चालविण्याचे प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक सेवा देणारी मुदत उलटून गेलेली वाहने मोठ्या प्रमाणावर आहेत. मुदतवाढीसाठी पुनर्नोंदणी शुल्क न भरताच वाहने दामटविण्याकडे वाहनचालक-मालकांचा कल असतो, असे वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्याने सांगितले. पाच वर्षे मिळतात वाढवून...वाहन १५ वर्षे जुने झाले की, पर्यावरण कर भरून ते वाहन आणखी पाच वर्षे चालविता येते. त्यासाठी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र आरटीओकडून घ्यावे लागते. असे प्रमाणपत्र देताना संबंधित वाहनाची तपासणी आरटीओ अधिकारी करतात. याशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने तांत्रिकदृष्ट्या सक्षम आाहेत अथवा नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी आरटीओची वायूवेग पथके कार्यरत असतात. वाहने असे प्रमाणपत्र देण्याच्या याेग्यतेची नसतात किंवा अपघातांमुळे जी वाहने दुरुस्त करण्यासारखी नसतात अशी वाहने भंगारात काढली जातात.

कारवाई सुरू आहे...केंद्र सरकारने स्क्रॅप पॉलिसी आणली आहे. तुम्ही स्वेच्छेने वाहने मोडीत काढू शकता. १५ वर्षांनंतर राज्य सरकारचा पर्यावरण कर लागतो. तसेच फिटनेस करणे आवश्यक आहे. फिटनेस शुल्क वाढविण्यात आले आहे.  १५ वर्षे जुन्या गाड्या चांगल्या असतील तर पर्यावरण कर, पुनर्नोंदणी आणि फिटनेस शुल्क भरून वापरता येतात. मात्र, फिटनेसशिवाय गाड्या वापरणाऱ्यांवर कारवाई कायम सुरू असते.

वय नव्हे, फिटनेस महत्त्वाचा !केवळ १५ वर्षे जुनी वाहने रस्त्यावर आहेत म्हणून रस्ता सुरक्षेवर परिणाम होत नाही. रस्ते अपघाताला वाहनांची गती हे मुख्य कारण असते. रस्त्यावर नव्या वाहनांची संख्या जास्त असून, जुनी वाहने त्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे, रस्ता सुरक्षेसाठी वाहनाचे वय नव्हे, तर फिटनेस महत्त्वाचा आहे. गतीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे.  - रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

वाहन प्रकारमोटारसायकल, स्कुटर, मोपेड, गाड्या, जीप, स्टेशन व्हॅगन, लक्झरी कॅब, रिक्षा, स्टेज कॅरेजेस, मिनी बस, शाळेच्या बसेस, खासगी सेवा वाहने, रुग्णवाहिका, ट्रक-लॉरी, टँकर, चारचाकी डिलिव्हरी वाहने, तीन चाकी डिलिव्हरी वाहने, ट्रॅक्टर, ट्रेलर्स, आदी उपस्थित होते.- अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी