शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राज्यात १० शहरे ‘स्मार्ट’ होणार

By admin | Published: August 28, 2015 4:56 AM

येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत देशातील किमान १०० शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशनसाठी निवड झालेल्या ९८ शहरांची नावे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश करताना केंद्राने राज्याने शिफारस केलेल्या यादीतून पिंपरी-चिंचवड वगळले आहे. पणजी हे गोव्याच्या राजधानीचे शहरही स्मार्ट शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील जम्मू की श्रीनगर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली की मेरठ याचा निर्णय न झाल्याने राहिलेल्या दोन प्रस्तावित ‘स्मार्ट सिटी’ज्ची नावे नंतर जाहीर करण्यात येणार आहेत.अशी झाली महाराष्ट्रातील शहरांची निवडमिशनच्या रचनेनुसार प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित करायच्या शहरांचा आकडा ठरविला होता. त्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला १० शहरे आली होती. राज्य सरकारांनी आपल्याकडील कोणती शहरे अशा प्रकारे विकसित केली जावीत हे पूर्वनिर्धारित निकषांनुसार ठरवून तसे प्रस्ताव ३१ जुलैपर्यंत केंद्राकडे पाठवायचे होते.राज्य सरकारने पुणे व पिंपरी-चिंचवड यांची एकत्र मोट बांधून १० शहरांची नावे पाठविली होती. केंद्र सरकारने त्यातून पिंपरी-चिंचवड वगळून १० शहरांची निवड केली आहे.ही आहेत शहरे..शहर लोकसंख्या (आकडेवारी लाखांत)बृहन्मुंबई १२४ पुणे३१.२४ ठाणे १८.४१ कल्याण-डोंबिवली १५.१८नाशिक १४.८६औरंगाबाद ११.६५नवी मुंबई ११.१९नागपूर ९.५२ सोलापूर ७.४५ अमरावती ७.४२ आयटी संपर्कता व डिजिटायझेशन, नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब, ई-गव्हर्नन्स यांच्यासह पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता, वाहतूक, घन कचरा व्यवस्थापन व परवडणारी घरे या सर्वाच्या माध्यमातून दर्जेदार नागरी जीवनमान उपलब्ध करून देण्याची योजना आहे. - एम. व्यंकय्या नायडू, नगरविकासमंत्री