उल्हासनगर : महापालिकेत हॅट्ट्रिक करणाऱ्या नगरसेवकांची संख्या १० तर सलग सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम शिवसेनेचे रमेश चव्हाण यांच्या नावावर झाला आहे. शिवसेनेचे धनंजय बोडारे, राजेंद्रसिंग भुल्लर सलग पाचव्यांदा तर मीना सोंडे सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत.उल्हासनगरात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्यात काही नगरसेवक यशस्वी झाले. संभाजी चौक परिसरातून सलग सहाव्यांदा निवडून येण्याचा विक्रम शिवसेनेचे रमेश चव्हाण यांनी केला. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर चारजणांचे पॅनल निवडून आणले. प्रभागातील विकास कामे, सुख-दु:खाला नागरिकांच्या मदतीला धावून जाणे, हे निवडी मागील मुख्य कारण असल्याचे ते म्हणाले. शहरातील सी ब्लॉक येथून शिवसेनेचे राजेंद्रसिंग भुल्लर व संतोषनगर परिसरातून धनजंय बोडारे हे सलग पाचव्यांदा निवडून आले. त्यांच्या पत्नी चरणजित कौर भुल्लर व वसुधा बोडारे याही सलग दुसऱ्यांदा महापालिकेत गेल्या आहेत. त्यांनीही प्रभागातील विकासकामांमुळेच विजयाची माळ गळ्यात पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.भाजपाच्या मीना सोंडे सलग चौथ्यांना निवडून आल्या आहेत. भाजपा व ओमी टीमच्या आशा बिऱ्हाडे, मीना कौर लबाना, राजेश वधारिया, हरेश जग्यासी, लक्ष्मी सिंग, रेखा ठाकुर, अर्चना करणकाळे, पुष्पा बागुल, मीना आयलानी, विजय पाटील, चरणजित कौर भुल्लर, साई पक्षाचे टोनी सिरवानी, कांजन लुंड, दिप्ती दुधानी, कॉग्रेसच्या अजंली साळवे, रिपाइंचे भगवानी भालेराव आदींना दुसऱ्यांदा संधी दिली. प्रभाग आरक्षणामुळे पालिकेचे विरोधी पक्ष नेता कुमारी ठाकुर यांनी मुलगी डिंपलला निवडणूक रिंगणात उतरविले. (प्रतिनिधी)>तिसऱ्या टर्मचे मानकरीहॅट्रीक करणाऱ्या नगरसेवकांत राष्ट्रवादीचे भरत गंगोत्री, सतरामदास जेसवानी, भाजपाच्या जया माखिजा, जयश्री पाटील, राजा वानखडे, जमनुदास पुरस्वानी, शिवसेनेच्या राजश्री चोधरी, वसुधा बोडारे, लिलाबाई आशांन, साईच्या इंदिरा उदासी आहेत.
उल्हासनगरात १० नगरसेवकांची हॅटट्रिक
By admin | Published: February 27, 2017 3:29 AM