शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

चालिया मंदिरात १० लाखाचे दागिने चोरीस

By admin | Published: May 25, 2017 12:11 AM

सिंधी समाजाचे प्रसिध्द चालिया मंदिरातून १० लाखाचे दाागिने चोरीला गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : सिंधी समाजाचे प्रसिध्द चालिया मंदिरातून १० लाखाचे दाागिने चोरीला गेले आहेत. साई झुलेलाल मंदिरातील मूर्तीवरील १७ प्रकाराचे सोन्याचे दागिने चोरटयांनी लंपास केले. ऐन घटनेच्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समजते. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील कॅॅम्प नं-५ येथे सिंधी समाजाचे आराध्य दैवत साई झुलेलाल यांचे चालिया मंदिर आहे. सुरक्षेसाठी मंदिर व परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र चोरीच्या घटनेच्या दरम्यान कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले असून चोरीबाबत पोलीस संभ्रमात पडले आहेत. तसेच मंदिरात सुरक्षारक्षक तैनात आहेत. चोरटयांनी साई झुलेलाल मूर्तीवर भाविकांनी चढवलेले लाखो रूपयाचे दागिने रात्री १ ते ३ च्या दरम्यान लंपास केले. याठिकाणी पोलीस चौकीची मागणी मंदिर विश्वस्तांनी यापूर्वीच केली आहे. मंदिरात सीसीटीव्ही आहेत, पण ते सुरू होते की बंद याबाबत संभ्रम होता.चालिया मंदिर सकाळी भक्तांसाठी खुले केल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. मंदिराचे विश्वस्त माजी नगरसेवक बच्चो रूपचंदानी यांच्यासह सहकाऱ्यांनी चोरीची माहिती हिललाईन पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन वाघमारे पथकासह मंदिरात दाखल झाले. त्यांनी मंदिराची पाहणी केल्यानंतर विश्वास्तांशी चर्चा केली. यावेळी १७ प्रकारचे विविध दागिने चोरीला गेले असून त्याची अंदाजे किंमत ९ ते १० लाख असल्याचे बोलले जाते. मंदिर परिसरात चोरीसह छेडछाडीच्या घटनेत वाढ झाल्याचा आरोप विश्वास्तांनी केला आहे. भाजपाचे शहर-जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी, शिवसेना नेते धनजंय बोडारे, पालिका सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, रवी खिलनानी, नगरसेवक सतराम जेसवानी आदींनी मंदिरात धाव घेतली. चोर मंदिरात गेलाच कसा? : मंदिराचे मुख्य प्रवेशद्बार बंद असून तेथे सुरक्षारक्षक तैनात असतात. तसेच अनेक गरीब, गरजू व भिकारी झोपलेले असतात. मंदिराचे आतील प्रवेशद्बार रात्री बंद केले जाते. तसेच साई झुलेलाल यांची मूर्ती काचेच्या खोलीमध्ये आहे. काचेच्या खोलीत जाण्यासाठी दरवाजा असून त्याला कुलूप लावले जाते. अशा ठिकाणी चोर जाणे अशक्य आहे. पोलिसांच्या मते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर बंद झाला आहे. मात्र सीसीटीव्ही घटनेच्या वेळी बंद असल्याचे समजते. या प्रकाराने पोलीस चक्रावून गेले आहेत.