खेट्री (जि. अकोला ): चान्नी येथे ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. विष बाधा झालेल्या ७ जणांना सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. भाजीत पाल पडल्याने विषबाधा झाली. पातूर तालुक्यातील चान्नी येथे दिलीप गवई यांनी घर बांधले. वास्तू शांतीचा कार्यक्रम गुरुवारी आयोजित करण्यात आला. रात्री जेवणही ठेवण्यात आले. जेवणात रोडगे ठेवण्यात आले. संध्याकाळी वाग्यांच्या भाजीत पाल पडली. या भाजीचे सेवन करण्यात आल्याने दिलीप गवई, आशाबाई गवई, रोशन गवई, आदित्य गवई, अनुराधा सरदार, माधुरी सरदार, नागेश सरदार यांच्यासह १0 जणांना विषबाधा झाली. जेवणानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे विषबाधा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले.
अन्नातून १0 जणांना विषबाधा
By admin | Published: July 04, 2015 1:03 AM