महेश चेमटे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झाले आहे. बाधितांसाठी तब्बल १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आचल खरे यांनी येथे दिली.महाराष्ट्रातील १०८ बाधित गावांपैकी १७ गावांच्या भूसंपादनास सुरुवात झाली आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.प्रकल्पासाठी ३०० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीची आवश्यकता आहे. बाधित १०८ गावांपैकी पालघर जिल्ह्यातील ७३, ठाण्यातील ३० आणि मुंबई विभागातील पाच गावांचा समावेश आहे.संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भूसंपादन प्रक्रियेत १७ गावांच्या जमिनीचेनमुना १ प्रसिद्ध करण्यात आलेआहे. रेल्वे प्रकल्पासाठीवेगवेगळे जमीन हस्तांतरण कायदे अस्तित्वात आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. तर गुजरातमध्ये केंद्रीय कायद्याप्रमाणे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.जमीन मोबदल्यासाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बाधितांना योग्य आर्थिक मोबदला मिळणार आहे. बाधित कुटुंबांना कुकुट पालन, शेळी पालन आदी व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येईल. व्यवसायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.- आचल खरे, अध्यक्ष, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोशनमुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनवेग : ३२० किमी प्रतितास , आसन क्षमता : ७५०एक ट्रेन : १० बोगींची , २०३३ : १६ बोगीची ट्रेन येणारमहिला, पुरुषांसाठी स्वतंत्र स्वछतागृह आणि शौचालयदिव्यांग प्रवासी : विशेष शौचालयबिझनेस आणि स्टँडर्ड क्लासबिझनेस क्लास : फ्रीजसह अन्य सुविधाबझनेस क्लास : एक बोगी राखीवउद्घोषणा सुविधा : मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजीआपत्कालीन व्यवस्था : १० मिनिटांत प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची सुविधाआपत्कालीन इंटरकॉम सुविधा
बुलेट ट्रेनच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटींची तरतूद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 4:29 AM