शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आरोप 100 कोटींचे; रुपयाचाही नाही पुरावा, अनिल देशमुखांनी मन मोकळे केले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 5:56 AM

आरोप तथ्यहीन आणि ऐकीव माहितीवर आधारित होते, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षांच्या वतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला. 

मुंबई : आपल्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुली केल्याचे आरोप करण्यात आले; मात्र एक रुपया वसुली केल्याचा पुरावा, काही आरोप करणारे देऊ शकले नाहीत; तसेच तपास यंत्रणांनाही माझ्याविरोधात रुपयाच्या वसुलीचेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे आरोप तथ्यहीन आणि ऐकीव माहितीवर आधारित होते, असा खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत नियम २९२ अन्वये विरोधी पक्षांच्या वतीने दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना केला. 

न्यायालयात जामिनासाठी मी अर्ज केला तेव्हा मला मेरिटवर जामीन देण्यात आला. आरोप ऐकीव माहितीवर झालेले आहेत. आरोप करताना कोणतेही सबळ पुरावे देण्यात आलेले नाहीत, ज्यांनी आरोप केले ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवता येणार नाही, अशी निरीक्षणे उच्च न्यायालयाने जामीन देताना नोंदवल्याचे अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.  

माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आऱोप झाला; पण जेव्हा आरोपपत्र दाखल झाले, तेव्हा १०० कोटींऐवजी त्यात १ कोटी ७१ लाखांचा उल्लेख करण्यात आला. त्याबाबत न्यायालयाने पुरावे मागितले, तर त्या १ कोटी ७१ लाखांचे पुरावेही देता आले नाहीत. त्यामुळे मला गुन्हेगार ठरवता येईल, असे पुरावेही नसल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे, असेही देशमुख यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केले.

आरोप तथ्यहीन असल्याचे चांदीवाल आयोगाकडून स्पष्ट  -चांदीवाल आयोगापुढेही सुनावणी झाली तेव्हा १०० कोटींचे आरोप करणाऱ्या परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत आपण ऐकीव माहितीवर आरोप केले, आपल्याकडे पुरावा नाही, असे म्हटले. तसेच सचिन वाझेनेही आरोप केले होते. त्याने आयोगापुढे शपथेवर सांगितले की, मी जे आरोप केले होते, मात्र त्यांनी माझ्याकडून पैसे मागितले नाहीत. त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, असे देशमुख यांनी सांगितले. 

- ईडी, सीबीआयच्या गुन्ह्यांतील जामीन प्रकरणात आणि चांदीवाल आयोगाचा अहवाल पाहिला तर माझ्यावरील आरोप तथ्यहीन होते, हे स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख