आविष्कार देसाई,
अलिबाग- आधार कार्ड काढण्यासाठी अद्यापही नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. आधार कार्ड आपापल्या बँक खात्याशी जोडल्यानंतरच शिक्षकांचे पगार होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सात हजार २६३ मुख्याध्यापक, शिक्षकांनी आधारकार्ड आपापल्या खात्याला जोडले आहेत. हा आकडा टक्केवारीच्या हिशेबात १०० टक्के आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या काही प्रमाणात वाढत आहे. सरकारने विविध योजना आखून त्याची अंमलबजावणी केल्याने शिक्षण विभागात आमूलाग्र बदल होत आहेत. परंतु शिक्षण विभागामध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची सात हजार ७९१ पदे मंजूर आहेत. पैकी ५२८ पदे रिक्त आहेत. उर्वरित सात हजार २६३ मुख्याध्यापक, शिक्षकांच्या संख्याबळावर जिल्ह्यातील शिक्षणाचा गाडा ओढावा लागत आहे.कमी मनुष्यबळ असताना देखील शिक्षण विभागाचे काम चांगले चालले आहे.आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याच्या सूचना केल्या होत्या. तसे न केल्यास पगार जमा होणार नव्हते. यासाठी जिल्ह्यातील सात हजार २६३ शिक्षकांनी आपापले आधारकार्ड बँक खात्याशी जोडण्यात यशस्वी झाले आहेत. हा आकडा १०० टक्के असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मुख्याध्यापक, शिक्षकांनी आधार कार्ड बँक खात्याला जोडावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता, त्यामुळे हे शक्य झाले आहे असेही बडे यांनी सांगितले. सात हजार २६३ मुख्याध्यापक शिक्षकांच्या बँक खात्यावर थेट पगार जमा होत आहेत, हे त्यांच्यासाठी ही चांगले आहे असे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी स्पष्ट केले. >सात हजार २६३ शिक्षककमी मनुष्यबळ असताना देखील शिक्षण विभागाचे काम चांगले चालले आहे. आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याच्या सूचना केल्या होत्या. तसे न केल्यास पगार जमा होणार नव्हते. यासाठी जिल्ह्यातील सात हजार २६३ शिक्षकांनी आपापले आधारकार्ड बँक खात्याशी जोडण्यात यशस्वी झाले आहेत. हा आकडा १०० टक्के असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले.