पुणे : राज्याला पुन्हा स्वाइन फ्लूचा विळखा बसू लागला असून, गेल्या २ दिवसांत या आजाराची लागण झालेले १०२ नवे रुग्ण सापडले, त्यामुळे राज्यातील लागण झालेल्यांची संख्या ६ हजार ८४३ वर पोहोचली आहे. तर, आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने यात बळी पडलेल्यांची संख्या ६२३ वर पोहोचली.स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये एक पुणे ग्रामीण भागातील तर दुसरा नाशिक ग्रामीण भागातील आहे. राज्यात शनिवारी स्वाइन फ्लूची लागण झालेले ६८ तर रविवारी ३४ रुग्ण सापडले. या दोन दिवसांत राज्यातील ३ हजार २८६ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०४ संशयितांना स्वाइन फ्लूविरोधी आॅसेलटॅमिवीर औषधे देण्यात आली. स्वाइन फ्लूची लागण झालेल्या ३९१ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर उपचारास उशीर केल्याने ३३ जणांच्या जिवावर हा आजार बेतला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.राज्यात स्वाइन फ्लूच्या ३० रुग्णांना डिस्चार्जस्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार मुंबईसह राज्यात फैलावत असल्यामुळे आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. राज्य पातळीवर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. स्वाइन फ्लू बाधित ३० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जुलै महिन्यात मुंबईत सुरू झालेली स्वाइनची साथ आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत राज्यभर पसरली आहे. सध्या ३९१ स्वाइन फ्लूचे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. ३३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. १ जानेवारी ते ३१ आॅगस्टदरम्यान राज्यात ६२३ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. तर राज्याबाहेरील ३३ रुग्णांचा राज्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात स्वाइनचे १०२ नवे रुग्ण
By admin | Published: September 01, 2015 1:40 AM