मुंबई : रेल्वे रुळांवर लोखंडी तुकडे, स्फोटक पदार्थ ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर पश्चिम रेल्वेने सुरक्षेचे उपाय योजत रेल्वे स्थानक हद्दीत भिकारी व फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ आणि २२ मार्च या दोन दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत रेल्वे सुरक्षा दलाच्या जाळ्यात १0५ जण अडकले आहेत. लोखंडी तुकडेही हटविण्यात यावेत, अशी सूचना करतानाच रेल्वे स्थानक व हद्दीत अनधिकृत फेरीवाले, भिकारी यांना हटविण्याची सूचना केली. त्यानुसार २१ आणि २२ मार्च या दोन दिवसांत १0५ जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अनुप शुक्ला यांनी दिली. (प्रतिनिधी)
105 भिकारी, फेरीवाल्यांवर कारवाई
By admin | Published: March 24, 2017 2:03 AM