शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

१०५ कंत्राटी चालकांचे मानधन थकले

By admin | Published: June 07, 2017 4:11 AM

केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १०५ वाहनचालकांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यांच्या मानधनाचा विषय मंगळवारच्या महासभेत मंजूर केला जाणार होता. मात्र, महासभाच तहकूब झाल्याने त्यांचे मानधन लांबणीवर पडले आहे. पावसाळा तोंडावर आल्याने घराची डागडुजी, कुटुंबाचा मासिक खर्च आणि १५ जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने वह्या, पुस्तके, गणवेशाचा खर्च कसा करा करायचा, असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. कल्याण-डोंबिवलीत घनकचऱ्याचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. घनकचरा प्रकल्प राबवण्यात होणाऱ्या दिरंगाईप्रकरणी उच्च न्यायालय तसेच हरित लवादाकडे याचिका न्यायप्रविष्ट आहे. कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी महापालिकेने राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून गाड्या खरेदी केल्या होत्या. या गाड्या अन्थोनी वेस्ट हॅण्डलिंग कंपनीला चालवण्यास दिल्या होत्या. मात्र, या कंपनीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. परंतु, महापालिकेने कामावर ठेवावे, यासाठी त्यांंनी औद्योगिक न्यायालयात लढा दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार २०१२ पासून हे चालक कार्यरत आहेत. मात्र, त्यांना तीन महिन्यापांसून मानधन दिले गेलेले नाही. दरमहा त्यांना १० हजार मानधन दिले जाते. त्यात वाढ केल्याने आता १६ हजार दिले जाणार आहेत. तीन महिन्यांचे ४२ हजार रुपये प्रत्येक वाहनचालकाचे थकले आहेत. महापालिकेने हे थकीत मानधन द्यावे, कंत्राटाला मुदतवाढ द्यावी, असा विषय मंगळवारच्या महासभेच्या पटलावर होता. परंतु, आयुक्तांच्या बदलीसत्राच्या कुरघोडीमुळे महासभा तहकूब झाल्याने त्यांचा विषय बारगळला. महापौरांच्या गैरहजेरीमुळे सभा झाली नसल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक राजन सामंत यांनी केला आहे.>...तर आरोग्य प्रश्न गंभीर कंत्राटी वाहन चालकांच्या सहा महिने नियुक्तीचा कालावधी २८ फेब्रुवारीला संपला. एक दिवसाचा खंड देऊन त्यांना पुन्हा १ मार्च २०१७ पासून सहा महिने मुदतवाढ देणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार सभा तहकूब होत असल्याने त्याचा फटका या कामगारांना बसला आहे.या कामगारांचा संबंध दररोज घाणीशी येतो. एक दिवस कचरा वाहून न नेल्यास कचराकुंड्या तुडुंब भरतात. तसेच कचरा रस्त्याच्या लगत पडून राहतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळा तोंडावर आहे. पावसाळ््यात कचरा न उचलल्यास अनारोग्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तीन महिने मानधन मिळाले नसले तरी कामगारांनी काम थांबवलेले नाही. पगार मिळण्याच्या आशेवर ते काम करत आहेत. या विषयाला तातडीने मान्यता देऊन त्यांचा मानधनाचा मुद्दा निकाली काढावा, अशी अपेक्षा नगरसेवक सामंत यांनी व्यक्त केली आहे.