मुंबई : रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून, याकरिता १०५.७८ कोटी रु. खर्चासही मान्यता देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या ९ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याच्या प्रस्तावास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे असे महाजन यांनी सांगितले. रत्नागिरीत चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरू होतील.
सिंधुदुर्ग येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित ५०० खाटांच्या रुग्णालयाकरिता आवश्यक एकूण १०८६ पदनिर्मितीच्या मान्यतेचा शासन निर्णय आधीच काढण्यात आला आहे.