शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

चार वर्षांत १०५ खंडणीखोर जेरबंद

By admin | Published: January 18, 2017 4:07 AM

चार वर्षांत खंडणीचे तब्बल तीन डझन (३६) गुन्ह्यांसह खंडणीसाठी अपहरणाचे ४ तसेच खंडणीसाठी अपहरण करून हत्येचा १ गुन्हा असे एकूण ४१ गुन्हे उघडकीस आणले

पंकज रोडेकर,

ठाणे- शहर पोलिसांनी मागील चार वर्षांत खंडणीचे तब्बल तीन डझन (३६) गुन्ह्यांसह खंडणीसाठी अपहरणाचे ४ तसेच खंडणीसाठी अपहरण करून हत्येचा १ गुन्हा असे एकूण ४१ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तर, १०५ खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच दरम्यान, शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने कुख्यात गुरू साटम, अनू आंग्रे, सुजित ऊर्फ तात्या पाटील, सिंधू अभंगे या चार टोळ्यांच्या हालचालींना कायमस्वरूपी ब्रेक लावला आहे. तर, रवी पुजारी तसेच उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये खंडणीसाठी धुडगूस घालणाऱ्या सुरेश पुजारी यासारख्या दोन टोळ्यांच्या हालचाली जवळपास ९० ते ९५ टक्के शांत करण्यात यश मिळाल्याचा दावा ठाणे पोलिसांनी केला आहे.शहर पोलीस आयुक्तपदाची सूत्रे परमबीर सिंह यांनी हाती घेतल्यानंतर आयुक्तालय कार्यक्षेत्रात खंडणीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार, ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने आयुक्तालय परिसरात खंडणीसाठी धमकावणाऱ्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले. खंडणीसाठी धमकावणाऱ्या गुरू साटम टोळीला शांत करण्यासाठी त्या टोळीच्या मार्गदर्शकांवर झडप घातली. त्याचपाठोपाठ अनू आंग्रे (छोटा राजन टोळीचा), तर काल्हेर येथील पाटील आणि अभंगे या चार टोळ्या जवळपास पूर्णपणे शांत झाल्या असताना, मध्यंतरी खंडणीसाठी रवी पुजारी टोळीचा जोर अचानक वाढू लागला होता. ही टोळी शांत करण्यासाठी टोळीतील पोलिसांनी रेकॉर्डवरील हस्तकांची धरपकड सुरू केल्यावर जवळपास २५ हस्तक पकडण्यात यश आले. सध्या ते जेलमध्ये आहेत. तसेच रवी पुजारीच्या बहिणींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने ही टोळी ९० ते ९५ टक्के शांत झाली. ही टोळी शांत होत नाही, तोच सुरेश पुजारी याने उल्हासनगर परिमंडळात व्यावसायिकांना धमकावण्यास सुरुवात झाली तसेच फायरिंगचेही काही प्रकार घडले. याचा अभ्यास करताना ठाणे पोलिसांनी व्यावसायिकांची माहिती पुरवणाऱ्यांसह टोळीच्या हस्तकांना अटक करण्यात यश आले. अशा प्रकारे या टोळीच्या ९५ टक्के हालचाली कमी झाल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख एन.टी. कदम यांनी दिली.पाच कोटी मागणाऱ्यास अटक कुख्यात टोळ्यांच्या पुढे जाऊन सर्वाधिक पाच कोटींची खंडणी मागणाऱ्यास ठाणे खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. >खंडणी पथकाची कारवाई तक्ता हॅकर्सला पकडलेइंटरनेट माध्यमानुसार मुलीचे फेसबुक, इन्स्ट्राग्राम, अकाउंट हॅक करून खंडणी मागणाऱ्यास अटक केली आहे. या हॅकर्सला छत्तीसगढमध्ये जाऊन पकडले. त्याचबरोबर आणखी एका गुन्ह्यात एका अल्पवयीन हॅकर्सला पकडले असून तो हजार-पाचशे रुपयांसाठी खंडणी मागत होता. खंडणी, दरोडे किंवा हत्या या गुन्हे उघडकीस आणताना एकाच वेळी सोनसाखळीचे ४५ गुन्हे उघडकीस आणून दीड किलो वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.चेकमेटमध्ये तीन कोटी जप्त केलेवागळे इस्टेट येथील चेकमेट या दरोड्यात खंडणी पथकाने सहा जणांना पकडून त्यांच्याकडून तीन कोटींची रोकड जप्त केली आहे.