शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कोकणातील १०५ गावे रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात; ४५० चौरस किमी क्षेत्रात १३ ग्रोथ सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 7:41 AM

सिडकोकडे सोपविलेल्या १,६३५ गावांतून काढली वेगळी, तिथे नव नगरे होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पालघर जिल्ह्यातील बोर्डीपासून ते सिंधुदुर्गातील बांद्यापर्यंतच्या १,६३५ गावांतील ६.४० लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्याचे विशेष अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय ताजा असतानाच त्यातील १०५ गावे वेगळी काढण्यात आली आहेत. या गावांसाठी राज्य रस्ते विकास महामंडळ-एमएसआरडीसी हे विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या गावांच्या ४५० चौरस किलोमीटर क्षेत्रात १३ ग्रोथ सेंटर अर्थात नव नगरे स्थापन होणार असून, त्याची जबाबदारी एमएसआरडीसीकडे असणार आहे.  या निर्णयाचा अर्थ असा की कोकण किनारपट्टीच्या विकासाची भविष्यातील दिशा सिडको आणि रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ठरविणार आहेत. विशेष म्हणजे सिडकोच्या नियुक्तीवरून नाराजीचे सूर उमटलेले असताना आणि त्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गरमागरम चर्चा झालेली असतानाही हा निर्णय अद्याप कायम आहे.  कोकण किनारपट्टी क्षेत्रातील १५ तालुक्यांतील १०५ गावांचे नियोजन करण्याचे अधिकार देणारी अधिसूचना राज्य सरकारने अलीकडेच काढली आहे.  पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण द्रुतगती महामार्ग व कोकण किनारपट्टी महामार्ग इंटरचेंजलगत १३ नव नगरे स्थापन करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करावी, अशी विनंती एमएसआरडीसीने ८-१० दिवसांपूर्वीच केली होती, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यावर आचारसंहिता लागू होण्याच्या गडबडीत निर्णयही झाला आहे.

इथे असतील १३ ग्रोथ सेंटर

  • वाढवण, केळवा (पालघर)
  • दोडावन, आंबोळगड, देवके व नवीन गणपतीपुळे (रत्नागिरी)
  • मालवण, नवीन देवगड (सिंधुदुर्ग)
  • दिघी, न्हावे, रेडी, रोहा, माजगाव (रायगड)

४१ पदे भरली जाणार

आता या ४५० चौरस मीटरच्या क्षेत्राची विकास योजना तयार करणे, तसेच नगररचनाविषयक कामकाजासाठी टाऊन प्लॅनिंग विभागातील ४१ पदे प्रतिनियुक्तीवर एमएसआरडीसीकडून भरली जाणार आहेत. त्यालाही राज्य सरकारने मान्यता दिली आहे. म्हणजेच चार जिल्ह्यांतील सध्याचे नगररचना विभागाचे अधिकारी या महामंडळासाठी काम करणार हे स्पष्ट आहे. ही अधिसूचना आणि १३ ग्रोथ सेंटरच्या क्षेत्राची हद्द दर्शविणारा नकाशा नागरिकांना पाहता यावा यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

टॅग्स :MSRDCराज्य रस्ते विकास महामंडळkonkanकोकणcidcoसिडको