मुंबई : राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून ओळखली जाणारी १०८ रुग्णवाहिका शुक्रवारपासून बंद होणार आहे. भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून चालविणाऱ्या या रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर व कर्मचारी प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. पण या संपाबाबत कोणतीही कल्पना दिलेली नाही. त्यामुळे संप केल्यास कारवाई करू, अशा इशारा आरोग्य संचालक संजीवकुमार कांबळे यांनी दिला.वेतनवाढ, वेतन करार, ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक, अधिकचे ड्युटीचे तास अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्याचा निर्णय घेतला. याबाबत औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पोलीस अधीक्षक, सर्व महापालिका आयुक्त यांना २८ सप्टेंबरला पत्र पाठवून कळवल्याचे महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी सांगितले.
आपत्कालीन सेवा म्हणून ओळखली जाणारी १०८ रुग्णवाहिका आजपासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 1:17 AM