मुंबई : कोरोनाने देशभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच एटीकेटीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एका वृत्त वाहिनीला दिली आहे. त्या सध्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यावेळी, दहावी-बारावीच्या नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात गायकवाड म्हणाल्या, "दहावीमध्ये जवळपास 1 लाख 25 हजार विद्यार्थी, तर बारावीला 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय काही विद्यार्थांना एटीकेटीही मिळाली आहे. दहावीतील एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना आपण अकरावीत प्रवेश देतो. मात्र नापास आणि एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत. जेने करून त्यांचे वर्षभराचे नुकसान होणार नाही.", असेही गायकवाड म्हणाल्या.
या परीक्षांसंदर्भात मंडळाने लवकर निर्णय घ्यावा, पालकांची मागणी -यासंदर्भात मंडळाने लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता, अद्याप काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच जोवर परिस्थिती कायम राहील तोवर शाळा आणि शैक्षणिक संस्था सुरू होण्याची शक्यताही कमीच आहे. यावर्षी मंडळाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकातही या परीक्षांसंदर्भात उल्लेख केलेला नाही. तर दुसरीकडे कोरनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शाळादेखील सुरू झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या -
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा
Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा