पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार करण्यात आला आहे. जुलै -ऑगस्ट २०१८ या काळात घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल २३.६६ टक्के लागला आहे. हे प्रमाण मागील वर्षापेक्षा ०.७८ टक्क्यांनी कमी आहे. यंदा १ लाख २१ हजार ०५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी २८ हजार ६४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.उत्तीर्ण झालेले विद्यार्थी इयत्ता ११वी'च्या नियमित प्रवेशास पात्र ठरणार आहेत.
निकालाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
- पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण मिळून नऊ विभागीय मंडळाच्या अंतर्गत घेण्यात परीक्षा घेण्यात आली.
- १७ जुलै २०१८ ते २ ऑगस्ट २०१८ याकाळात घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
- औरंगाबाद विभागाचा सर्वाधिक ३२.८३ निकाल, मुंबई विभागाचा सर्वात कमी १७.१२टक्के निकाल
- परीक्षा घेताना इंग्रजी, गणित, सामान्य गणित विषयासाठी बहुसंची प्रश्नपत्रिकांचा वापर
- उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमास पात्र
इयत्ता दहावीचा विभागनिहाय सर्वसाधारण निकाल
विभाग | परीक्षेला बसलेले | उत्तीर्ण | टक्केवारी |
पुणे | १९०८७ | ४५३० | २३.७३ |
नागपूर | १३३३० | ३६१८ | २७.१४ |
औरंगाबाद | १२९५९ | ४२५५ | ३२.८३ |
मुंबई | ३३३९७ | ४७४७ | १४.२१ |
अमरावती | १०८३७ | ३४४३ | ३१.७७ |
कोल्हापूर | ८१२६ | १३९१ | १७.१२ |
नाशिक | १२७२७ | ३७३६ | २९.३५ |
कोकण १८.१२ | ९१६ | १६६ | १८.१२ |
लातूर | ९६८० | २७५९ | २८.५० |
एकुण | १२१०५९ | २८६४५ | २३.६६ |