देशभरात भाजपाचे ११ कोटी सदस्य : व्यंकय्या नायडू यांची माहितीसोलापूर : भारतीय जनता पार्टी ही एकमेव अशी पार्टी आहे की ज्याचे देशभरातुन ११ कोटी सदस्य आहेत. आज एकमेव पक्ष असा आहे की तो दिवसें दिवस वाढत चालला आहे. केंद्र शासनाने नोटा बंदी केल्यामुळे कोट्यावधी रूपये बँकेत जमा झाले आहेत. हा पैसा कोणाचा आहे, कसा आला आहे याची चौकशी केली जाणार आहे असल्याचेही केंद्रीय नागरी विकास मंत्री व संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले. भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने सोलापूर शहरच्या वतीने लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील बालाजी गार्डन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत व्यंकय्या नायडु बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार अॅड. शरद बनसोडे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना व्यंकय्या नायडु म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हाणाला प्रतिसाद देत ज्या लोकांनी गॅस सबसीडी परत केली त्यापोटी १२५ कोटी रूपये शासनाकडे जमा झाले आहेत. हे पैसे सर्वसामान्य गरीब जनतेमध्ये मागेल त्याला गॅस या उपक़्रमासाठी वापरण्यात येणार आहे असे नायडू म्हणाले. अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या तीन प्रमुख गरजा आहेत. या गरजेतुन सोलापूरला ३0 हजरा घरकुले मंजूर झाली आहेत. ही घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहेत. या योजनेत आणखी १0 हजार घरांची भर घालुन एकूण ४0 हजार घरे देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना घर नाही अशा सर्वसामान्य जनतेमधील प्रत्येकाला घर दिले जाणार आहे असेही यावेळी व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उपस्थित होते. ----------------------डायनामिक महापौर देण्यासाठी भाजपाला साथ द्या़़़सोलापूरला स्मार्ट सिटी व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरभरून दिले असे असतानाही महानगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने निधीचा वापर करण्या ऐवजी शहराची वाट लावली. त्यामुळे आता सोेलापुरकरांनी केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आहेत आता सोलापूरला डायनामिक महापौर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमता बरोबर एकहाती सत्ता द्या असे आवाहनही व्यंकय्या नायडू यांनी केले़
देशभरात भाजपाचे ११ कोटी सदस्य : व्यंकय्या नायडू यांची माहिती
By admin | Published: February 17, 2017 3:36 PM