शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

पालिकेच्या तिजोरीत एकाच दिवशी ११ कोटी

By admin | Published: July 02, 2016 2:04 AM

मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती

पिंपरी : मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने जाहीर केलेली सवलत योजनेची ३० जून ही अखेरची मुदत होती. त्यामुळे एकाच दिवसात सुमारे ११ कोटी रुपये कर जमा झाला आहे. तर गेल्या तीन महिन्यांत १६६ कोटी रुपयांचा मिळकतकर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकर भरण्यासाठी ३० जून ही मुदत देण्यात आली होती. शास्तीकर लावून मिळकतकराची वाढीव बिले आल्याने कर भरण्याविषयी नागरिकांत संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, शास्तीकर वगळून बिले भरण्याची सुविधा महापालिकेने दिल्याने शास्ती वगळून कर भरण्यास नागरिक प्राधान्य देत होते. करसंकलनासाठी महापालिकेने जनजागृती अभियानही राबविले होते. शहरातील प्रमुख चौकात फ्लेक्सही उभारले होते. ‘मिळकतकराची रक्कम भरावी, यासाठी करसंकलन विभागाने सामान्य करात ५० टक्क्यांपर्यत सवलतीची योजना राबविली होती. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून रविवार सुटीच्या दिवशीही कर भरण्याची सोय केली होती. त्याचबरोबर आॅनलाइन भरण्याची सुविधाही महापालिकेने उपलब्ध करून दिली होती. आॅनलाइन भरण्यास मोठा प्रतिसाद मिळाल्याचे करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडली.(प्रतिनिधी)>दहा हजार मिळकत धारकांनी  भरला करगुरुवारी एकाच दिवशी एकूण १० हजार ५५२ जणांनी मिळकतींचा सुमारे दहा कोटी ९५ लाखांचा कर नागरिकांनी भरला आहे. सर्वाधिक भरणा थेरगाव विभागातून झाला आहे. ५७१ मिळकतधारकांनी सुमारे दोन कोटींचा कर भरला आहे. त्या पाठोपाठ भोसरीतील केंद्रावर ५८२ जणांनी सुमारे १ कोटी ९ लाख रुपये कर भरला, तसेच पिंपरी वाघेरेतील केंद्रावर ३०५ जणांनी १ कोटी ६ लाख ९६ हजारांचा कर भरला आहे. गेल्या तीन महिन्यांत १ लाख ८३ हजार ५५२ जणांनी १६६ कोटी कराचा भरणा झाला आहे.