शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

११ ‘खुनी’ पोलिसांची पुन्हा तुरुंगात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2015 1:55 AM

छोटा राजन टोळीचा हस्तक मानला गेलेल्या रामप्रसाद विश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट चकमकीत खून केल्याबद्दल जन्मठेप झालेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.

मुंबई : छोटा राजन टोळीचा हस्तक मानला गेलेल्या रामप्रसाद विश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट चकमकीत खून केल्याबद्दल जन्मठेप झालेल्या ११ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.सत्र न्यायालयाने जुलै २०१३मध्ये जन्मठेप ठोठावल्यापासून हे सर्व पोलीस ठाणे मध्यवर्ती कारागृहात होते. परंतु ३ डिसेंबर रोजी राज्य सरकारने, कथित विशेष अधिकाराचा वापर करून, त्यांच्या शिक्षेला सहा महिन्यांची स्थगिती दिल्याने ते तुरुंगातून बाहेर आले होते. मात्र उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारच्या या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिल्याने या पोलिसांना शरण येऊन पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे.लखनभय्याचा भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात याचिका केली आहे. न्या. रणजीत मोरे आणि न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठापुढे त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. युग चौधरी, दोषी पोलिसांसाठी ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले आणि सरकारतर्फे अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर उषा केजरीवाल यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने याचिका दाखल करून घेत सरकारच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. प्रतिवादी पोलिसांनी येत्या ४ जानेवारीपर्यंत पुन्हा तुरुंगात जाण्यासाठी स्वत:हून शरण यावे, असा आदेश देत याचिकेरील पुढील सुनावणी ७ मार्च रोजी ठेवली.हे आहेत ते ११ पोलीसदिलीप पालांडे, नितीन सरतापे, गणेश हरपुडे, आनंद पडते, प्रकाश कदम, देवीदास सकपाळ, पांडुरंग कोकम, रत्नाकर कांबळे, संदीप सरदार, तानाजी देसाई आणि विनायक शिंदे. (प्रतिनिधी)