शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

राज्यात ११ लाख शेतकरी पीक विमा लाभास अपात्र

By admin | Published: July 08, 2014 1:14 AM

राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी

आठ जिल्ह्यांंना भोपळा : ३ लाख शेतकऱ्यांना ८७ कोटींचा लाभरूपेश उत्तरवार - यवतमाळराष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवित मदत नाकारण्यात आली आहे. केवळ २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी मदतीस पात्र दाखविण्यात आले असून त्यांना नुकसानभरपाईपोटी ८७ कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. राज्यात २०१३-१४ मध्ये राष्ट्रीय पीक विमा योजना राबविण्यात आली. १४ लाख ८३ हजार ९६३ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. गतवर्षी खरिपात अतिवृष्टी, त्यानंतर परतीच्या पावसाचा फटका आणि रबीत गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. अनेक दिवसांपासून शेतकरी अडचणीत सापडले होते. त्यामुळे पीक विमा रकमेची आतुरतेने वाट बघत होते. अखेर पीक विमा कंपनीने मदत जाहीर केली. त्यात सोयाबीन उत्पादक सर्वाधिक १ लाख २२ हजार ३२० शेतकरी, कापूस उत्पादक १३ हजार ३६३ आणि बाजरी, उडीद, मूग, ज्वारी, तुरीसह इतर पिकांना मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील १४ लाख शेतकऱ्यांनी ७९ कोटी १० लाख ८५ हजार २४० रूपयांचा विमा हप्ता भरला होता. यातील ११ लाख शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. तर २ लाख ८६ हजार ८०१ शेतकरी पात्र ठरले आहेत. आठ जिल्ह्यांना भोपळाराज्यातील आठ जिल्ह्यांना या योजनेतून छदामही मिळाला नाही. यामध्ये गोंदिया, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या ९७ हजार ११४ शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी ११ कोटी ४७ लाख रूपयांचा विमा उतरविला होता. यवतमाळला ३४ कोटी यवतमाळ जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी १९ कोटी ८९ लाख ३१ हजार रूपयांचा विमा काढला होता. यातील ९७ हजार ९०६ शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. १ लाख ५९ हजार शेतकऱ्यांना मदतीस मुकावे लागणार आहे. पात्र शेतकऱ्यांना ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १६८ रूपयांची मदत दिली जाणार आहे.