मुंबई : कोकण रेल्वेवर कोलाड ते ठोकुर दरम्यान दुहेरीकरण करण्याबरोबरच या मार्गावर ११ नवीन स्थानकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावर कोलाड ते ठोकुर या ७४१ किलोमीटरपर्र्यतचे टप्प्याटप्यात दुहेरीकरण केले जाणार आहे. कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करताना प्रवाशांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार नव्या अकरा स्थानकांचा समावेशही करण्यात आला आहे. सध्या कोलाड ते ठोकुरपर्यंत ६५ स्थानके असून आता ही संख्या ७६ होणार आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनीही ११ नवीन स्थानकांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविल्याचे सांगितले. या प्रस्तावावर महिन्याभरात निर्णय होईल. या स्थानकांची नावे सध्या जाहीर करणे योग्य नसल्याचे गुप्ता म्हणाले. कासू ते नागोठणे कामएप्रिलपर्यंत पूर्ण होणारमध्य रेल्वेकडूनही दिवा ते रोहापर्यंतच्या दुहेरीकरणाच्या कामाला गती देण्यात येत आहे. सध्या दिवा ते कासूपर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर कासू ते नागोठणे या १३ किलोमीटर अंतराचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल. मध्य रेल्वेवरील दुहेरीकरणाच्या प्रकल्पाची किंमत ३00 कोटींपेक्षा जास्त असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
को.रे.वर ११ नवीन स्थानके
By admin | Published: February 10, 2016 1:13 AM