शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

उजनी प्लसकडे, चार दिवसात ११ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 2:40 PM

-

सिध्देश्वर शिंदे : आॅनलाइन लोकमतबेंबळे : पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाल्याने उजनी धरणात गेल्या चार दिवसात जवळपास ११ टक्के पाणीसाठा वाढला आहे़ सध्या उजनी धरणात दौंड येथून १३,५८६ क्युसेक्सचा विसर्ग मिसळत आहे़ त्यात कमी झालेल्या बंडगार्डनच्या विसर्गात सकाळपासून वाढ झाली असून, सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे. गेल्या चार दिवसांपासून वरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनीत जवळपास ७ टीएमसी पाणी वाढले आहे़ या पावसामुळे गेल्या तीन महिन्यांपासून उजनीला पडलेला मायनसचा विळखा आज सायंकाळपर्यंत निखळला़उजनी धरण प्लसमध्ये येणे म्हणजे एकप्रकारचे धरण भरण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे़ सध्या उजनी धरणातून थोड्याफार प्रमाणात पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे़ त्यात पाऊस नियमितपणे पडू लागल्याने त्या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे़ म्हणून १९ पैकी १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग चार-पाच दिवसात मोठ्या प्रमाणात चालू होण्याची दाट शक्यता आहे़ सोलापूर जिल्ह्यात पावसाने आणखी ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले असले तरी उजनीत दौंडमधून विसर्ग येऊ लागला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ उजनी गेल्या वर्षापेक्षा जवळपास एक महिना अगोदर प्लसमध्ये येत आहे़ कारण गेल्या वर्षी उजनी धरणात पाणी लवकर येण्यास सुरुवात झाली आहे़---------------सोशल मीडियात फक्त उजनीची चर्चासध्या सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांत फक्त उजनी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत चर्चा होत आहे़ प्रत्येक शेतकऱ्याला उजनीत पाणी किती येतेय? किती टक्के झाले? मायनसमधून प्लसमध्ये कधी येणार? पुण्यात पाऊस चालू आहे काय? किती दिवस पाणी येत राहील? पाणीसाठा किती झाला? आणखी किती होऊ शकेल? अशा एक ना अनेक प्रश्नांची चौकशी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे़ उजनी धरण सोलापूर, उजनी धरण संघर्ष समिती आदींसारख्या ग्रुपमध्ये याची सतत चर्चा सुरू आहे़ अशा ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी अ‍ॅडमिनला विनंत्या केल्या जात आहेत़एक नजर- आज उजनी धरणाची पाणीपताळी ४९०़६४० मी़- एकूण पाणीसाठा: १७२७़१९ दलघमी- उपयुक्त पाणीसाठा: ७५़६२ दलघमी-टक्केवारी:- ४़९८ टक्के (मायनस)- विसर्ग: दौंड १३५८६ क्युसेक्स- बंडगार्डन १९७२० क्युसेक्स