शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई- गोवा महामार्गाच्या कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर

By admin | Published: April 17, 2017 10:58 PM

मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - मुंबई- गोवा महामार्गाच्या महाराष्ट्रातील कामासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर केले असून, हा संपूर्ण मार्ग हरित महामार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करण्यासह नवीन झाडांची लागवड आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्पाच्या एक टक्के रक्कम राखून ठेवण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.केंद्र शासनाच्या विविध निधींतून महाराष्ट्रात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे येथील कार्यालयात गडकरी यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम) मदन येरावार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) प्रवीण पोटे- पाटील, आमदार बाळा भेगडे आदी उपस्थित होते.संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाच्या कालावधीत 2014 पर्यंत देशभरात 5 हजार 700 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते, असे सांगून गडकरी म्हणाले की, त्यानंतर आतापर्यंत 19 हजार 525 किमी लांबीचे मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन निर्मिती केल्या जाणाऱ्या महामार्गांचाही समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्ग हा महत्त्वपूर्ण मार्ग जानेवारी 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महामार्गाचे 20 हजार कोटीचे विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केले असून, त्यापैकी महाराष्ट्रातील मार्गासाठी 11 हजार 747 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.या बैठकीत गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय), महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून राज्यात चाललेल्या महामार्गांच्या कामांचा आढावा घेऊन सूचना केल्या. गोवा महामार्गावरील कशेडी येथील 1.75 किमी लांबीच्या बोगद्याच्या कामातील अडचणी दूर करून 2018 पर्यंत हे काम पूर्ण करावे. जानेवारी 2019 मध्ये गोवा महामार्गाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने कामाला गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.गडकरी पुढे म्हणाले की, महामार्गांवर नदीवरील पुलांचे बांधकाम करताना हे पूल बॅरेजेस म्हणून रुपांतरित करण्यासाठी त्याप्रमाणे आराखडे तयार करावेत. पाणीटंचाईच्या काळात हे पुलाचे बॅरेजेस उपयुक्त ठरतील. मराठवाडा, विदर्भात राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीसाठी मुरुम तसेच मातीची गरज भासते. अशा वेळी स्थानिक शेतकऱ्यांना विनामूल्य शेततळे खोदून देऊन तेथील मुरुम या कामासाठी घेतल्यास शेतकऱ्यांचाही फायदा होईल.गोवा महामार्गाला समांतर आणि डहाणू- वसई- अलिबाग- श्रीवर्धन- दाभोळ- गणपतीपुळे- रत्नागिरी- देवगड- मालवण ते वेंगुर्ला असा समुद्र किनाऱ्याशेजारून जाणारा कोकण पर्यटन सागरी महामार्ग हा कोकणातील पर्यटनाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या महामार्गाचा डीपीआरही जवळपास पूर्ण झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया 31 मे 2017 पर्यंत पूर्ण करून कार्यादेश देण्यात यावेत, अशाही सूचनाही त्यांनी दिल्या.