राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 16 - मराठवाड्यातील बीड मध्ये राहणाय््राा ११ वर्षीय समदान शेखला जन्मत: ह्रदयरोग असल्याने त्याच्या प्रकृती सतत बिघाड होत होती. अखेर त्याच्या ह्रदयावर मीरारोड येथे नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांच्या विश्रांतीचा सल्ला झिडकारुन त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या ८ दिवसांनंतर चौथीची परिक्षा दिली. सलिम शेख यांचा मुलगा समदानला जन्मत: ह्रदयरोग जडला होता. मात्र त्याचे निदान गेल्या ११ वर्षांपासुन होत नव्हते. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत सतत बिघाड होत होती. वरवरच्या उपचारानंतर त्याला काही काळापुरते बरे वाटत होते. मार्चमध्ये शालेय परिक्षांचा कालावधी सुरु झाल्यानंतर समदाननेही इयत्ता चौथीच्या परिक्षेची तयारी सुरु केली होती. परीक्षेची तयारी करण्यासाठी तो आपल्या मित्राकडे गेला असता त्याला चक्कर आल्याने तो खाली कोसळला. सुरुवातीला उन्हामुळे चक्कर आली असेल, असा समज त्याच्या पालकांचा झाला. परंतु, वांरवार त्याला उलटी व चक्कर येऊ लागल्याने त्याला स्थानिक डॉक्टरांकडे उपचारार्थ नेण्यात आले. तेथे त्याला उच्च रक्तदाब असल्याचे निदान करण्यात आले. समदानची परीक्षा जवळ येत होती व त्याच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे बीड मधील डॉक्टरांनी पुढील उपचारार्थ मुंबईत जाण्याचा सल्ला त्याच्या पालकांना दिला. शेख कुटुंबाने बोरीवली येथील नातेवाईकांचे घर गाठले. नातेवाईकांनी समदानला त्वरीत मीरारोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल केले. त्याचे सीटी स्कॅन व इतर तपासणी केल्यानंतर त्याला हृदयरोग झाल्याचे निदान करण्यात आले. त्याच्या हृदयातून बाहेर पडणारी मुख्य धमनी आकुंचित (कोर्क्टेशन आॅफ दि अॅरोटा) असल्याने शरीराला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नव्हता. त्यामुळे हृदयातून निघणाय््राा सर्वात मोठया धमनीच्या (रक्तवाहिनी) सुरुवातीला अडथळा निर्माण झाला होता. त्यासाठी धमनीजवळ स्टेण्ट बसवण्याची शस्रक्रिया (कोरॅकटोप्लास्टी) करण्याचा सल्ला त्याच्या पालकांना देण्यात आला. त्याला पालकांनी होकार दिल्यानंतर ह्रदयविकार तज्ञ डॉ. अनुप ताकसांडे यांच्या चमुने शस्त्रक्रियेची तयार सुरु केली. ही दुर्मिळ शस्रक्रिया असुन ती साधारणत: पौढावर केली जाते. त्यातच समदानच्या ह्रदयाची पुर्णता: वाढ झाली नसल्याने त्याचा रक्तदाबाचे संतुलन ठेवणे चमुला आव्हान ठरणारे होते. मात्र डॉ. ताकसांडे यांच्या नियंत्रणाखाली आधुनिक उपचार पद्धतीनुसार विशिष्ट प्रकारच्या फुग्यांद्वारे (इरश्रश्रेपी) आकुंचित असलेल्या ह्रदयातील झडपा किंवा रक्तवाहिन्या मोठ्या करुन त्याला सततच्या त्रासातुन मुक्त केले. १६ मार्चच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी समदानला किमान एक महिन्याची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने विश्रांतीचा सल्ला झिडकारुन ८ दिवसानंतर बीडमध्ये जाऊन ३० मार्च ते १२ एप्रिल दरम्यान शालेय परिक्षेला हजेरी लावली. एवढा मोठा आजार असतानाही माझ्या मुलाची शिक्षणाची आवड बिलकुल कमी झाली नाही. त्या जिद्दीनेच त्याने परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याची प्रकृती उत्तम असल्याचे समदानचे वडील सलीम यांनी सांगितले. चौकट : भारतामध्ये दरवर्षी सरासरी अडीच कोटी मुले जन्माला येतात. त्यापैकी सुमारे अडीच लाख बालकांना जन्मजात हृदयरोग जडलेला असतो. शिशुच्या हृदयाचा विकास त्याच्या मातेच्या पोटात सुरूवातीच्या चार महिन्यातच होतो. मोठया गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून हृदयाची निर्मिती होत असल्याने मातेच्या गर्भारपणात काही अडचणी आल्यास शिशुच्या हृदयात अडचणी निर्माण होतात व भविष्यात त्याचे रूपांतर हृदयविकारात होते. भारतातील कुपोषणाचे प्रमाण पाहता पाश्चिमात्य देशांपेक्षा आपल्याकडील हृदयरोग झालेल्या मुलांची संख्या कितीतरी अधिक असण्याची शक्यता डॉ अनुप ताकसांडे यांनी व्यक्त केली.
ह्रदयशस्त्रक्रियेनंतर ११ वर्षीय समदानने दिली चौथीची परीक्षा
By admin | Published: April 16, 2017 4:12 PM