शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

११४ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा सुरू

By admin | Published: March 04, 2017 3:01 AM

नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय घेतला

जयंत धुळप,अलिबाग- केंद्र शासनाच्या ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ (एनओएफएन) या अंतर्गत देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ब्रॉडबँड इंटरनेट सेवेद्वारे जोडून हायटेक करण्याचा निर्णय घेतला असून, ही योजना राबविण्याकरिता केंद्र, राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. या एनओएफएन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील ८२५ ग्रामपंचायती हायटेक करण्याचे काम रायगड बीएसएनएलच्या माध्यमातून प्रगतिपथावर आहे. ११४ ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात रायगड बीएसएनएलने आघाडी घेतली असल्याची माहिती रायगड बीएसएनएलचे उप महाव्यवस्थापक सी.व्ही.राव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.राज्य शासनाने राज्यातील सर्व २८ हजार ग्रामपंचायती संगणकीकृत करून ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत यासारखे कार्यक्र म राबविणे सुरू केले आहे. सर्व जिल्हापरिषदा व पंचायत समित्याही संग्राम प्रकल्पाच्या माध्यमातून इंटनरेटद्वारे जोडल्या गेल्या आहेत. सुमारे २० हजार गावांत ई-बँकिंगचीही सुविधा उपलब्ध केली जात असून अशी सेवा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास व अन्य रस्ते विकास कामांच्या वेळी मुख्य आॅप्टिकल फायबर केबल (ओएफसी) वारंवार तुटण्याच्या प्रकारामुळे बीएसएनएलला यासाठी अनेकदा व्यत्यय येत असतो. ही समस्या दूर करण्याकरिता जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या सहयोगाने प्रयत्न करण्यात येत आहेत. या सेवेमुळे ग्रामस्थांना विविध सेवा-सुविधा, विविध १९ प्रकारचे दाखले, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, शेतमालाचे बाजारभाव, शासनाच्या योजना, हवामानाचे अंदाज हे घरबसल्या अत्यल्प वेळात स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत. >समस्यांवर मात करून कनेक्टिव्हिटीब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्राप्त या ११४ ग्रामपंचायतींमध्ये खालापूर तालुक्यातील ४२ पैकी २९, म्हसळा तालुक्यातील ४० पैकी २९, मुरुडमधील २४ पैकी २१, श्रीवर्धनमधील ४२ पैकी ३५ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील एकू ण ८२५ ग्रामपंचायतींपैकी ६८८ ग्रामपंचायतींकरिता ओएफसी केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे तर ३९५ ग्रामपंचायतींना ओएफसी कनेक्टिव्हिटी येत्या काही दिवसांत देण्यात येवू शकणार आहे. ग्रामपंचायतींकरिता बीएसएनएलचे किफायतशीर इंटरनेट प्लॅन देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.